नांदेड/प्रतिनिधी..दीपक नगर तरोडा बुद्रुक भागातील श्रीनिकेतन प्राथमिक व माध्यमिक शाळेच्या संयुक्त विद्यमाने डॉ.बाबासाहेब आंबेडकर लोक शिक्षण प्रसारक मंडळाचे सचिव के.जी. नरवाडे यांच्या हस्ते ध्वजारोहण करून स्वातंत्र्य दीन उत्साहात साजरा करण्यात आला.यावेळी कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून मुख्याध्यापिका डॉ.सौ.एस.एन राऊत, मुख्याध्यापक यशवंत थोरात यांची प्रमुख उपस्थिती होती.
कार्यक्रमात सर्वप्रथम भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर,राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या प्रतिमेस मान्यवरांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करुन अभिवादन करून सामूहिक तंबाखू मुक्त शपथ घेण्यात आली. शाळेच्या प्रांगणात विद्यार्थ्यांनी कवायत, लेझीम व डंबेल्स चे सादरीकरण, प्राथमिक विभागातील विद्यार्थ्यांचे भारत मातेसाठी सभिनय वंदन गीत, शाळा परिसरात विद्यार्थ्यांची निघालेली प्रभात फेरी या सर्व कार्यक्रमाचे पालकांनी तोंड भरून कौतुक केले.
यावेळी संस्थेचे सचिव के.जी.नरवाडे, मुख्याध्यापिका. डॉ .सौ.एस.एन.राऊत, मुख्याध्यापक यशवंत थोरात यांच्यासह शाळेतील शिक्षक, माध्यमिक व प्राथमिक विभागातील विद्यार्थी यश बोंधडे, भक्ती उटीलवाड, रोहन गजभारे, रिषभ सानतोडे , मानसी वडेट्टी,शिवम पवार, स्नेहल पोतरे, वैभवी कराळे, अखिल नरवाडे,आयुशी बिर्हाडे,आराध्या बिर्हाडे, मनस्वी रणवीर, माही केदारे, यश खंदारे, स्वरा खंदारे, हर्षद कीर्तने, आरोही खंदारे,आदींनी स्वतंत्र दिनावर प्रकाश टाकला. सिद्धार्थ नगर येथील युवा कार्यकर्ते रोहन अरुण कांबळे त्यांच्या वतीने विद्यार्थ्यांना शालेय साहित्याचे वाटप तर संस्थेचे सचिव के.जी. नरवाडे यांच्या हस्ते विद्यार्थ्यांना खाऊ वाटप करण्यात आले .यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश सचिव प्रा.सुनील नानवटे, युवक जिल्हाध्यक्ष स्वप्नील इंगळे, युवा नेते अमोल मालेगावकर, अभिजीत कांबळे, क्षितिज बनसोडे, जतीन कांबळे, विशाल राऊतखेडकर, आशिष भास्करे, यांच्यासह प्राथमिक, माध्यमिक शाळेतील शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी, विद्यार्थी,पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचलन सहशिक्षक प्रल्हाद आयनेले यांनी तर उपस्थितांचे आभार सौ.कांचन घोटकेकर यांनी मानले.

0 Comments