तालुका प्रतिनिधी हिमायतनगर
मो नंबर. 9561871019
हिमायतनगर. लोकशाहीर डॉ अण्णा भाऊ साठे क्रांती सेना नांदेड जिल्हा उपाध्यक्ष मा. संतोष हातवेगळे यांचे अल्पशा आजाराने दुर्दैवी निधन झाले. त्यांच्या जाण्याने संघटनेने एक निष्ठावान, कर्तबगार आणि जनतेसाठी झटणारा कार्यकर्ता गमावला आहे.असे दुःख सांत्वन पर भेटीत सचिन साठे यांनी व्यक्त केले
२७ जुलै रोजी राष्ट्रीय अध्यक्ष मा. सचिन भाऊ साठे यांनी त्यांच्या निवासस्थानी जाऊन कुटुंबीयांची भेट घेतली, सांत्वनपर शब्द सांगितले आणि या दुःखद प्रसंगात संघटना सदैव त्यांच्या सोबत असल्याचा विश्वास दिला.
सचिन भाऊ साठे म्हणाले – "संतोष हातवेगळे हे कार्यकर्ते नव्हते, तर संघटनेचे आधारस्तंभ होते. त्यांच्या जाण्याने कधीही भरून न येणारी पोकळी निर्माण झाली आहे. त्यांच्या कुटुंबियांच्या पाठीशी आम्ही सर्वजण खंबीरपणे उभे आहोत."संपूर्ण संघटनेतर्फे दिवंगत आत्म्यास श्रद्धांजली अर्पण करण्यात येत आहे या वेळी जिल्हाध्यक्ष पंडित वाघमारे, मराठवाडा उपाध्यक्ष विलास झिंजोरे , जिल्हा सहसचिव संतोष बनसोडे, जिल्हा उपाध्यक्ष मिलिंद वाघमारे, जिल्हा कार्याध्यक्ष संजय बोथीकर, गजानन वाघमारे, विनोद खडकीकर, बालाजी शिराणे, मारोती गाडेकर , आदी उपस्थित होते.

0 Comments