तालुका प्रतिनिधी हिमायतनगर
हिमायतनगर येथील सदन शेतकरी गजानन तुपतेवार यांच्या शेतीमध्ये ड्रॅगन फ्रुट या फळाची लागवड त्यांनी केलेली असल्याने आज हिमायतनगर दौऱ्यावर नांदेड जिल्ह्याचे जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांनी त्यांच्या शेतामध्ये जाऊन ड्रॅगन फ्रुट ची पाहणी केली आहे
हिमायतनगरच्या कर्तव्यदक्ष तहसीलदार सौ पल्लवीताई टेमकर हिमायतनगरचे मंडळ अधिकारी बी.एम चव्हाण हिमायतनगर सजाचे तलाठी पुरी , सुबनवाड, बिराडे यांच्यासोबत शेतकरी बाळू अण्णा चौरे आधी शेतकरी उपस्थित होते
तुपतेवार यांच्या शेतातील ड्रॅगन फ्रुट ची पाहणी करताना राहुल कर्डिले जिल्हाधिकारी यांनी समाधान व्यक्त केले आहे
या वेळी गजानन तुपतेवार यांच्या शेतातील ड्रॅगन फ्रुट ची पाहणी करताना राहुल कर्डिले म्हणाले की गजानन तुपतेवार यांचा आदर्श घेऊन शेतकऱ्यांनी ड्रॅगन फ्रुट ची लागवड करावी असे जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांनी भेटि दरम्यान सांगितले आहे

0 Comments