नांदेड जिल्ह्याचे सुपर पॉवर पोलीस अधीक्षक अबिनाश कुमार यांनी नांदेड जिल्ह्या मध्ये अवैध धंद्याला आळा बसण्यासाठी मोठे प्रयत्न केले असताना सुद्धा नायगाव तालुक्यातील कुंटूर पोलीस ठाण्याचे तत्कालीन सहाय्यक पोलीस निरीक्षक राम कृष्ण हरी पाटील यांनी अवैध धंदेवाल्यांना प्रोत्साहन देऊन पत्रकाराचा तिरस्कार आज पर्यंत केला आहे
जिल्ह्याच्या नायगाव तालुक्यातील कुंटूर पोलीस ठाण्यात तत्कालीन सहाय्यक पोलीस निरीक्षक बहत्तरे यांची बदली झाल्याच्या नंतर कुंटूर पोलीस ठाण्याला सध्या कुंटूर पोलीस ठाण्यातून उचल बांगडी करण्यात आलेले सहायक पोलीस निरीक्षक रामकृष्ण श्रीहरी पाटील यांनी कुंटूर पोलीस स्टेशनच्या कार्यक्षेत्रात अवैध धंद्याला प्रोत्साहन देऊन या भागातील पत्रकारांचा मोठा तिरस्कार केला आहे
नायगाव तालुक्यातील कुंटूर पोलीस ठाण्याला सन १९९८ पासून अनेक जबरदस्त व जबाबदार पोलीस अधिकारी येऊन गेले परंतु कोणताच पोलीस अधिकारी कुंटूर पोलीस ठाण्याच्या कार्यक्षेत्रातील काळे धंदे लपविण्यासाठी प्रयत्न केला नाही नाही परंतु गेल्या वर्षा पासून कुंटूर पोलीस ठाण्याचा कारभार सांभाळणारे सपोनि पाटील यांनी पत्रकाराचा तिरस्कार करून संपर्कातुन अलिप्त राहिले आहे
तालुक्यातील कुंटूर पोलीस ठाण्यात सपोनि पाटील यांनी कार्यरत असताना मी एक पोलीस अधिकारी असून मी फार प्रामाणिक पणे काम करीत असल्याचे दाखवून देत होते परंतु ठाण्याच्या अंतर्गत मात्र अवैध धंद्याला प्रोत्साहन देऊन अवैध धंद्याला खतपाणी घालत होते अशा सहाय्यक पोलीस निरीक्षकाची उचल बांगडी करण्यात आली आहे

0 Comments