Header Ads Widget

साहेब पिण्यासाठी पाणी देता का हो पाणी साहेब हिमायतनगर शहरातील गणेशवाडी येथील नागरीकांची नगरपंचायत च्या अधिकार्यांना अर्थ टाहो . नगरपंचायत प्रशासनाने तात्काळ दखल न घेतल्यास लोकशाही मार्गाने अमरण उपोषण करणार.... बालाजी ढोणे ( महाराष्ट्र स्वराज्य पक्ष )

नागोराव शिंदे पळसपुरकर 
हिमायतनगर शहरातील वार्ड क्रमांक ४ मध्ये गणेशवाडी, राॅयलनगर, मुजिबनगर चा समावेश आसल्याने येथील नागरीकांना पाणीपुरवठा होत नसल्याने येथे भीषण पाणी टंचाई परिस्थिती निर्माण झाली आहे. अनेक वेळा नगरपंचायतीच्या पाणी पुरवठा विभागात खेटे घालून देखील नगरपंचायत चे मुख्य अधिकारी या कडे दुर्लक्ष करून नागरीकांना पाणीपुरवठा करत नसल्याचे नागरिकातुन बोलल्या जात आहे. मागील काळात शासनाकडून आलेल्या कोट्यावधी रुपयाचा खर्च करून सुद्धा हिमायतनगर नगरपंचायतीच्या अधिकार्यीना पाणी पुरवठ्यासाठी  यश मिळाले नसल्याने  हिमायतनगर शहरातील  पाणी पुरवठ्यासाठी  या योजनेत खर्च केला का आणी केला तर मग पाणी कुठ गेले या संभ्रमात येथील नागरीक आहेत. यावर तत्काळ नगरपंचायत प्रशासनाने लक्ष न दिल्यास येत्या १९ /५/ २०२५  रोजी लोकशाही मार्गाने बेमुदत अमरण उपोषण करणार असल्याचे गणेशवाडी येथील सामाजिक कार्यकर्ते बालाजी ढोणे यांनी नगरपंचायत प्रशासनास लेखी निवेदन देऊन तक्रार केली आहे. या काळात काही अनुसूचित घटना घडल्यास याला संपूर्ण नगरपंचायत प्रशासन जबाबदार राहणार असल्याचे ढोणे यांनी एका निवेदनाद्वारे इशारा दिला आहे.

Post a Comment

0 Comments