Header Ads Widget

पोलिसांचा नाद कोणीच करायचा नाही : नांदेडच्या ग्रामीण पोलीस ठाण्याचे सिंगम पोलिस निरीक्षक चिंचोलकर यांच्यासह त्यांच्या पोलीस टीमने अवैध पणे रेतीची चोरटी वाहतूक करणाऱ्या हायवा टिपरला पकडून केले जप्त !!

      माधव पवार 
नांदेडच्या ग्रामीण पोलीस ठाण्याचे सिंगम पोलिस निरीक्षक चिंचोलकर यांच्यासह त्यांच्या पोलीस टीमने अवैध पणे रेतीची चोरटी वाहतूक करणाऱ्या हायवा टिपरला पकडून जप्त करण्यात आल्याची माहिती मिळाली आहे नांदेडच्या ग्रामीण पोलीस ठाण्यात सध्या कार्यरत असलेले दमदार व सिंघम पोलीस निरीक्षक ओमाकांत चिंचोलकर यांनी यापूर्वी नायगाव पोलीस ठाण्यासह लोहा पोलीस ठाण्यात कार्यरत असताना अशाच पद्धतीच्या दमदार पोलीस कारवाया पोलीस अधीक्षकांच्या आदेशानुसार केल्या आहेत

नांदेड जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक अबीनाश कुमार यांनी जिल्ह्यात अवैध धंद्याला आळा बसावा म्हणून अनेक प्रयत्न चालू केले असले तरी संबंधित पोलीस ठाण्याच्या पोलिसांच्या नजरा चुकवून चोरट्या मार्गाने रेतीची अवैधपणे विक्री करण्यासाठी गोदावरीच्या पात्रातून रेती काढली जात असल्याचे समजते आहे 

 ग्रामीण पोलीस ठाण्याचे सिघम पोलीस निरीक्षक ओमाकांत चिंचोलकर यांनी कायदा व सुव्यवस्था अबाधित ठेवण्यासाठी मोठे प्रयत्न करीत असतात व अवैध धंदे करणाऱ्यांवर पोलीस कारवाईचा भडगा उगारल्या शिवाय राहत नाहीत ते म्हणजे पोलीस वर्दीची पोलीस निरीक्षक चिंचोलकर यांची धमक आहे 

Post a Comment

0 Comments