Header Ads Widget

प्रशासनाच्या बेजबाबदार पणामुळे बरबड्याच्या एटीएम मध्ये पैशाचा तुटवडा - ए टी एम धारक वैतागले !!

       माधव पवार 
नायागांव तालुक्यातील मौजे बरबडा येथील एटीएम हे नुसती शोभेची वस्तू बनली असून प्रशासनाच्या बेजबाबदार पणामुळे बरबड्याच्या एटीएम मध्ये पैशाचा तुटवडा पडला असल्यामुळे ए टी एम धारक चांगले वैतागले आहे 

तालुक्यातील बरबडा नगरी ही १५ ते १६ हजार लोकांची वस्ती असल्यामुळे या गावात येथील खातेदाराला व जन सामान्य माणसाला बँकेतून पैसे उचलण्यासाठी वेळ लागतो आणि सदरच्या एटीएम मधून तात्काळ पैसे काढता यावे म्हणून सदरच्या एटीएमची निर्मिती केली असली तरी या एटीएम मध्ये अधून मधून पैसाचा तूटवडा होत आहे 

बरबडा येथील नागरिकांना व बाहेरगावातून येणाऱ्या जाणाऱ्या नागरिकांना पैसाची अतिशय आवश्यकता असते त्यानुसार आपल्या बँकेतील रक्कम एटीएम द्वारे काढण्यासाठी एटीएम गेल्याच्या नंतर दिनांक ८ मार्च २०२५ रोजी सदरच्या एटीएम मध्ये केवळ २०० रुपये होते 

ते २०० रुपयाची रक्कम एटीएम धरकांनी काढल्याच्या नंतर या एटीएम मध्ये खणखणाट असल्याचे वास्तव चित्र दिसून आले आहे

सदरील बरबड्याच्या एटीएम मध्ये अधून मधून आर्थिक तुटवडा होऊ नये म्हणून संबंधित बँक अधिकाऱ्यानी मोठी काळजी घेण्याची गरज भासत असून अशा प्रकारची गैरसोय बँकेच्या टाळावी अशी मागणी जन सामान्य माणसातून केली  जात आहे 

Post a Comment

0 Comments