Header Ads Widget

रमजान महिन्याच्या निमित्ताने रुई बु ची ५ वर्षाची छोटीशी मुलगी रुमाना राजेसाब शेख हिने धरला कडाक्याच्या उन्हाळ्यात उपवास - सर्वत्र कौतुक !!

      माधव पवार 
मुस्लीम बांधवांच्या उपवासाच महिन्याला प्रारंभ झाला असून यालाच ‘रमजान’चा अर्थात ‘बरकती’चा महिना असे म्हणत असल्यामुळे हा सदरचा उपवास नायगाव तालुक्यातील रुई बु येथील रहिवासी असलेले रिजवाना शेख राजेसाब शेख यांची छोटीशी मुलगी रुमाना राजेसाब शेख हिने सदर उपवास धरली असल्यामुळे तिचे कौतुक करण्यात येत आहे 

मुस्लिम बांधवाचा उपवासाचा महिना म्हणजे मनामनातील दरी कमी करून परस्परा मध्ये स्नेहभाव, सद्भाव वाढविणारा हा महिना असून संयम त्याग शांती सहिष्णुता चांगुलपणा प्रामाणिकपणा माणसांच्या ठायी रुजविणारा हा महिना असल्यामुळे सदरचीं मुलगी रुमाना राजेसाब शेख हिने कडाक्याच्या उन्हात उपवास धरून एक जनतेला चांगुल पणाचा संदेश देत आहे 

सदरील रमजानचा महिना हा माणसाला वाईटा पासून वासने पासून शेकडो मैल दूर ठेवणारा हा महिना असून या महिनचे महात्म्य, पावित्र्य सांगावे तेवढे कमीच आहे

मनाचं मागणं पूर्ण करणार्‍या, बरकतीची मुक्तपणे उधळण करणार्‍या या महिन्याच्या चंद्राची तमाम मुस्लीम बांधव अधीरतेने प्रतीक्षा करीत असतात. चंद्राच्या दर्शनाने प्रत्येकाच्या चेहर्‍यावर प्रसन्नतेची पहाट फुलत असते. घरादारात, मुहल्ल्यात आनंद भरभरून ओसंडत असतो. ‘चाँद दिख, चाँद दिख’चा गलका आसमंतात चैतनचे कारंजी उडवू लागतो आहे 

मुस्लीम बांधव आपापसातील वैरत्व द्वेष विसरून हस्तांदोलन करतात आलिंगन देतात त्यांच्या निखळ जिव्हाळने सबंध माहोल स्नेहमय होऊन जात असतो या संपूर्ण महिनाभर अत्यंत कडकडीत रोजे पाच वेळेचा नियमित नमाज कुराण पठण अन् अल्लाहचे स्मरण चिंतन करायचे असते या तीस दिवसात उपासधारकांच्या तनमनाची शुद्धी होते

म्हणून इस्लाम धर्मात रमजान महिन्याला अनन्साधारण महत्त्व देण्यात  आले आहे. हा महिना अत्यंत पवित्र अन् मंगलमय मानला गेला आहे

Post a Comment

0 Comments