Header Ads Widget

नायगाव तालुक्यात अंगठा येत नसलेल्या शेतकऱ्याचे किसान क्रेडिट कार्ड ओटीपीवर निघतो तर केवायसीका ? होत नाही - शेतकऱ्यांचा संताप जनक सवाल !!

      माधव पवार 
नांदेड जिल्ह्याच्या नायगाव तालुक्यातील खेड्यापाड्यात असलेल्या शेतकऱ्याचे अंगठे येत नसल्यामुळे प्रशासनाने आधार लिंक असलेल्या मोबाईलच्या ओटीपी वर केवायसी करून घेण्याची मागणी शेतकऱ्यानी केली शेतकऱ्याचे अनुदान व पंतप्रधान सन्मान योजनेचे आणि मुख्यमंत्री सन्मान निधी योजनेचे हप्ते पडत नसल्यामुळे शेतकऱ्याला सर्वच बाबी पासून वंचित राहावे लागत आहे 

शेतकऱ्यांना लुटण्यासाठी सरकारला केवळ ओटीपी वर सर्व काही काम काज जमते तर शेतकऱ्याला देण्यासाठी मात्र अंगठ्याची अट घालून वेठीस धरला जात आहे 

तालुक्यातील शेकडो शेतकऱ्याचे आणखी येत नसल्यामुळे शेतकऱ्यांना शासकीय अनुदान असह पंतप्रधान सन्मान निधी व मुख्यमंत्री सन्मान निधी त्याचबरोबर पिक विमा अंगठी येत नसलेल्या शेतकऱ्यांच्या बँक खात्यात पडत नसल्यामुळे शेतकरी राजा प्रचंड हैराण झाला असल्याचे स्पष्ट चित्र दिसून येत आहे 

या राज्यातले दळभद्री सरकार शेतकऱ्याला जाचक अटी लावून चांगलेच वेटेज ठरल्यामुळे शेतकऱ्याला विविध समस्याला तोंड द्यावे लागत असून सतत केवायसी करणे हा एक शासनाचा खेळ खंडोबा वाढला असल्यामुळे शेतकऱ्यांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे 

शेतकऱ्यांना किसान क्रेडिट कार्ड काढण्यासाठी मार्ग म्हणजे सरळ आणि सोपा मार्ग म्हणजे दिलेल्या आधार लिंकच्या मोबाईल नंबरवर ओटीपीच्या द्वारे किसान क्रेडिट कार्ड निघतो तर शेतकऱ्यांची केवायसी का ओटीपी वर होत नाही असा संताप जनक सवाल शेतकऱ्यांनी या दळभद्री सरकारला केला आहे 

Post a Comment

0 Comments