तालुका प्रतिनिधी हिमायतनगर
हिमायतनगर. बिहारमधील महाबोधी महाविवार हे बौद्ध बांधव किंवा बौद्ध भिकू यांच्या स्वाधीन करा व त्या ट्रस्टमध्ये सर्व बौद्ध धर्म यांची निवड करा या मागणीला पाठिंबा म्हणून दिनांक १७. ३. २०२५रोजी धरणे आंदोलन तहसील कार्यालय हिमायतनगर येथे करण्यात येणार असल्याचे निवेदनात सुभाष दारवंडे यांनी तहसीलदार सौ. पल्लवी टेमकर यांना दिलेल्या निवेदनात असे म्हटले आहे की मागील अंदाजे २० ते २२दिवसापासून महाबोधी महाविहार आंदोलन बिहार येथे सुरू असून तेथील राज्य सरकार राज्य शासन हे कुठलाही निर्णय घेत नसल्याने हा बौद्ध धर्मावर अन्याय आहे व भारतीय संविधानात कलम २५ ते २८ नुसार देशातील प्रत्येक धर्मियांना धार्मिक स्वातंत्र्य जपण्याचा अधिकार आहे त्यामुळे बौद्ध धार्मिक ठिकाण असलेल्या बौद्ध विहारात व इतर धर्मांचा हस्तक्षेप नको व त्यात ट्रस्टी मधील बिगर बौद्ध धर्म आहेत त्यांना त्या ट्रस्ट मधून कायमचे कमी करून बरखास्त करण्यात यावे व सदरील बिहार सरकारने हा निर्णय ताबडतोब घ्यावा व महाबोधी विहार बौद्ध अनुयायी यांच्या स्वाधीन करावे या प्रमुख मागणीला जाहीर पाठिंबा म्हणून दिनांक १७. ३. २०२५पासून हिमायतनगर तहसील कार्यालय येथे समस्त तालुक्यातील बौद्ध बांधव बौद्ध भगिनी व बौद्ध अनुयायी यांच्या वतीने तहसील कार्यालय हिमायतनगर जिल्हा नांदेड येथे धरणे आंदोलन शासकीय वेळेनुसार दररोज करण्यात येईल याची सर्वस्वी जबाबदारी प्रशासनाची असेल असे सुद्धा या निवेदनात दारवंडे यांनी म्हटले आहे या निवेदनावर राजकुमार राऊत रवींद्र भालेराव सिद्धार्थ लोखंडे संजय वाडेकर पळसपुरकर आदींच्या स्वाक्षऱ्या आहेत

0 Comments