Header Ads Widget

रुई परिसरात विजेच्या कडकडात होऊन तुरळक पाऊस विद्युत पुरवठा खंडीत !!

      माधव पवार 
नायगाव तालुक्यातील रुई बु व रुई परिसरात दिनांक २० मार्च २०२५ रोजी दुपारी १२ वाजण्याच्या सुमारास आकाशात ढगाळ वातावरण होऊन विजेचा कडकडात होऊन तुरळक पाऊस पडला असला तरी गार पिट कुठे ही झाले नसल्याचे व्रत आहे 

सदरचा विजेचा कडकडाट चालू असल्यामुळे या भागातील विद्युत पुरवठा खंडित झाला असून एकीकडे गर्मी आणि दुसरीकडे विजेचा कडकडाट चालू असल्यामुळे सदरील नागरिकांना घरातच कोंबून राहावे लागत आहे 

सध्या उन्हाळ्याचे दिवस असल्यामुळे अगोदर उन्हाचा कडाका वाढला त्यातच आकाशातील ढगाळ वातावरणामुळे सदरच्या मानवला गर्मीचा त्रास जाणवला आहे 

तालुक्यातील रुई बु परिसरात रात्री उशिरा पर्यंत म्हणजे ९ वाजण्याच्या सुमारास विजेचा कडकडाट चालू होऊन रिमझिम पाऊस पडला असल्यामुळे सदरच्या आवकाळी पावसामुळे शेतातील जागलीला गेलेल्या शेतकऱ्यात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे 

Post a Comment

0 Comments