Header Ads Widget

रुई बु ते इज्जतगाव रस्त्यावर घडलेली घटना म्हणजे नुसती अफवाच तसा प्रकार घडलाच नाही तहसीलदार डॉ धम्मप्रियाताई गायकवाड !!

     माधव पवार 
नायगाव तालुक्यातील रुई ते इज्जतगाव रस्त्यावर घडलेला प्रकार हा लावा पदार्थ नसून तो विद्युत पुरवठा लोखंडी तणाव्यात उतरल्यामुळे तसा प्रकार घडू शकतो असा दावा विद्युत वितरण कंपनीच्या कर्मचाऱ्या कडून केला जात असताना सुद्धा चुकीच्या पद्धतीच्या अफवा केल्या जात आहेत 

या भागात लावा सारखा पदार्थ अर्थात जाळ जमिनीतून बाहेर निघाला नाही व लाईट बंद होतच सदरचा जाळ बंद झाला तर मग कुठला हा लावा पदार्थ असू शकतो काय असे ही सुज्ञान नागरिकातुन बोलल्या जात आहे 

इज्जतगाव रुई बु रस्त्यावर सदरचा घडलेला प्रकार हा नुसती अफवाच असून त्या आफेवर कोणी ही विश्वास ठेवू नये असे आवाहन नायगावच्या तहसीलदार डॉ धम्मप्रियाताई गायकवाड यांनी नागरिकांना केल्या आहेत 

तालुक्यातील रुई बु इज्जतगाव परिसरातील कोणत्याही नागरिकांच्या मनात भीती नाही कोणता ही नागरिक अजिबात भयभीत झाला नाही चुकीच्या लोकांकडून माहिती घेऊन चुकीची अफवा पसरण्यात येऊ नये असे आवाहन ही नायगावच्या कर्तव्यदक्ष तहसीलदार डॉ धम्मप्रियाताई गायकवाड यांनी नायागांव फास्ट न्युज बोलताना सांगितल्या आहेत 


Post a Comment

0 Comments