नायगाव विधानसभा मतदार संघांचे विद्यामान आमदार राजेश पवार यांच्या संकल्पनेतून मुख्यमंत्री शंभर दिवस या योजने अंतर्गत रुग्णाची तपासणी करण्याचे आदेश दिले असल्याने नायगाव तालुक्यातील रुई बु येथील प्राथमिक आरोग्य उपकेंद्रात रुग्णाची तपासणी करण्यात आली यावे क्षेय रोग मुक्त करण्यासाठी सरकार प्रयत्न करीत आहे
नांदेड जिल्ह्याच्या नायगाव तालुक्यातील बरबडा प्राथमिक आरोग्य केंद्राच्या अंतर्गत येत असलेल्या रुई बु येथील प्रार्थमिक आरोग्य उपकेंद्रात रुग्णाच्या सेवेसाठी तपासणीचे शिबिर आयोजित करण्यात आले होते
जिल्ह्यातील नायगाव तालुक्याचे भारतीय जनता पार्टीचे विद्यामान आमदार राजेश पवार यांनी त्यांच्या शासकीय संकल्पनेमधून सदरील योजनेची निर्मिती केली असल्यामुळे शंभर दिवसाच्या कालावधीत रुग्णाच्या सेवेसाठी मोफत सेवा ही संबंधित दवाखान्यात शिबिराचे आयोजन करण्यात आले असल्यामुळे रुग्णाला या बाबीचा चांगला फायदा होत आहे
बरबडा प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी डॉ चांडोळे यांच्या मार्गदर्शनाखाली सदरच्या शिबिराचे आयोजन करण्यात आले होते
प्राथमिक आरोग्य उपकेंद्र रुई बु येथील डॉ सय्यद अजरा सी एच ओ, संगेवार जी आर एच ए, एम बि गोकुळे एम पी डब्लू, टी यु कागडे ए एन एम, के एस भरोडे, ए एन एम, पिंकू गरदनमारे अशा, सरस्वती कोठेवाडे आदी यावेळी उपस्थित होते

0 Comments