Header Ads Widget

ग्रामीण पोलीस स्टेशनने सुरु केली सराईत गुन्हेगार दत्तक घेण्याची योजना गुन्हेगाराला आयुष्यात सुधारण्यासाठी संधी !!

       माधव पवार 
नांदेड जिल्हाचे पोलीसa अधीक्षक अविनाश कुमार यांनी त्यांच्या ऑपरेशन फ्लॅश आउट योजनेअंतर्गत ग्रामीण पोलीस स्टेशनचे दबंग पोलीस निरीक्षक ओमाकांत चिंचोलकर यांनी ग्रामीण पोलीस स्टेशनच्या हद्दी मध्ये सराईत आरोपी दत्तक योजना सुरू केली असल्यामुळे गुन्हेगाराला सुधारण्याची व चांगले राहण्याची संधी मिळणार आहे

या योजने मध्ये ग्रामीण पोलीस स्टेशनच्या हद्दी मध्ये राहणारे गुन्हेगार जे गुन्हेगार अटल आहेत सराईत आहेत ज्यांच्यावर ३ पेक्षा जास्त गुन्ह्याची नोंद आहे

जे वारंवार गुन्हे करतात ज्यांच्यावर कारवाई करून ही पुन्हा त्यांच्याकडून गुन्हे घडले आहेत अशा आरोपी साठी सदरची दत्तक योजना राबविण्यात येत आहे.
 
सदर योजनेमध्ये डीबी च्या अमलदार यांना प्रत्येकी पाच पाच सराईत आरोपी वाटून देण्यात आलेले आहेत.
 हे प्रत्येक आरोपी कुठे राहतात काय काम करतात सध्या त्यांच्या काय हालचाली आहेत ते गावात आपल्या घरी राहतात का की बाहेरगावी कामाला गेलेले आहेत 

याबाबत सविस्तर माहिती काढली जात आहे. या सराईत आरोपीला रोज डीबी चे अंमलदार यांच्यामार्फत घरी जाऊन तपासले जात आहे. सदर आरोपीचे मित्र कोण त्यांच्या नावाची यादी बनवली जात आहे 

सदर आरोपी कुठल्या ठिकाणावर बसतात कुठून कुठे जातात काय करतात यावर बारकाईने लक्ष दिले जात आहे. सदर आरोपीचे सोशल अकाउंट फेसबुक इंस्टाग्राम स्नॅपचॅट याच्यावर बारकाईने लक्ष ठेवून हे कोणत्या पद्धतीच्या पोस्ट करतात काय पोस्ट करतात त्यांच्या पोस्टला कोण कॉमेंट्स करते याबाबत सविस्तर नोंदी घेण्यात येत आहेत.
 
सदर आरोपीकडून त्यांच्या शेजारचे गावातील एरिया मधील नागरिक यांच्याकडून  त्यांच्या वर्तनाबद्दल माहिती काढली जात आहे.

 सदर आरोपीस आठवड्यातून एक दिवस पोलीस स्टेशनला आणून त्यांचे समुपदेशन करण्यात येत आहे.

 सराईत आरोपी याला सुधारण्याची पुरेपूर संधी देण्यात येत आहे पोलीस स्टेशनला आणून त्याचे समुपदेशन केले जात आहे

 सराईत आरोपी याचे वर्तन योग्य नसेल आणि पोलिसांच्या समुपदेशाने तो सुधरणारा नसेल तर अशा आरोपीवर  एम.पी.डी.ए., हद्दपारी ची कारवाई करण्यात येत आहे.

ग्रामीण पोलिसांनी सराईत गुन्हेगारावर आत्तापर्यंत 18 एम पी डी ए प्रस्ताव पाठविले आहेत तर मुंबई पोलीस अधिनियम कलम ५५,५६ प्रमाणे एकूण ५२ सराईत आरोपींना हद्दपार करण्यासाठी प्रस्ताव पाठविलेले आहेत.
 
ग्रामीण पोलिसांकडून सराईत आरोपींना सक्त इशारा देण्यात आलेला आहे की एक तर त्यांनी गुन्हेगारी सोडून चांगली वर्तणूक ठेवावी किंवा नांदेड ग्रामीण पोलीस स्टेशनची हद्द सोडून निघून जावे अन्यथा ग्रामीण पोलिसांनकडून कायद्यातील सक्त ती सक्त कारवाई करण्यात येईल असे सांगण्यात आले आहे 

Post a Comment

0 Comments