Header Ads Widget

जलजीवन मिशनची बंद कामे तात्काळ चालू करण्यात यावे म्हणून नूतन जिल्हाधिकारी राहूल कर्डिले यांच्या वसंत पाटील सुगावे यांची निवेदनाद्वारे मागणी

      माधव पवार 
नांदेड जिल्ह्यात मागील दोन वर्षांपासून पाणीपुरवठा विभागाचे जलजीवन मिशनचे काम चालू होते पण शासनाकडे या कामांसाठी निधी नसल्यामुळे ही कामे कंत्राटदारानी बंद केली आहेत

जिल्ह्यातील घुंगराळा येथील रहिवासी असलेले तथा राजकीय क्षेत्रात गेल्या अनेक वर्षा पासून गावच्या विकासासाठी व घुंगराळा परिसरातील विविध विकास कामाच्या संदर्भात सत्तेतील राजकीय नेत्याकडे विकास निधी मंजूर करून घेण्यासाठी प्रयत्न करीत आहेत 

राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश सरचिटणीस वसंत पाटील सुगावे यांनी योग्य धावपळ असते जिल्ह्याला लाभलेले नूतन कलेक्टर राहूल कर्डिले यांचा विशेष सत्कार करून मागणी केली आहे 

जिल्ह्यातील जलजीवन मिशनची बंद कामे तात्काळ चालू करण्यात यावे म्हणून नूतन जिल्हाधिकारी राहूल कर्डिले यांच्या वसंत पाटील सुगावे यांची निवेदनाद्वारे मागणी

ग्रामीण भागात अनेक गावांत कामे अपूर्ण असून जिल्ह्याचे नूतन जिल्हाधिकारी राहूल कर्डिले यांनी लक्ष घालून राज्य शासनाकडे पाठपुरावा करून या कामाच्या संदर्भात प्रलंबित असलेल्या मागण्याची पूर्तता करण्यात यावे अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेश सरचिटणीस वसंत पाटील सुगावे यांनी जिल्हाधिकारी यांच्याकडे केली आहे
    
सध्या उन्हाळा चालू झाला असून जिल्ह्यात अनेक गावांत पाणी प्रश्न मोठया प्रमाणावर भेडसावत असून अशात सदर कामे ही अर्धवट व अपूर्ण आहेत 

याबाबत जिल्हाधिकारी यांनी लक्ष घालून शासनाकडे या कामांबाबत पाठपुरावा करून बंद असलेली कामे तात्काळ चालू करावी अशीही मागणी या निवेदनाद्वारे करण्यात आली.
    
यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे शहर कार्याध्यक्ष फेरोज पटेल राष्ट्रवादी काँग्रेस सहकार सेलचे प्रदेश कार्याध्यक्ष बालाजीराव शेळके राष्ट्रवादी काँग्रेस ग्रंथालय सेलचे प्रदेश कार्याध्यक्ष संतोष दगडगावकर राष्ट्रवादी काँग्रेस सेवादल 

जिल्हाध्यक्ष रमेश गांजापूरकर श्रीकांत मांजरमकर 
राष्ट्रवादी काँग्रेस सेवादल जिल्हा उपाध्यक्ष सत्तार अहेमद शेख,आनंद सूर्यवंशी, युवक उपाध्यक्ष शेख इरफान आदी पदाधिकारी उपस्थित होते.



Post a Comment

0 Comments