Header Ads Widget

तहसिलदार तथा तालुका दंडाधिकारी हिमायतनगर यांच्या कडुन शेतकरी लाभार्थी यांना कागदपत्र दाखल करण्याचे पल्लवी टेमकर यांचे आवाहन

नागोराव शिदे 
हिमायतनगर शेतकरी लाभार्थी यांना कागदपत्र दाखल करण्याचे पल्लवी टेमकर तहसीलदार यांनी आव्हान केले आहे सविस्तर असे कि 
महाराष्ट्र शासन अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक सरंक्षण विभाग यांचे शासन निर्णयान्वये, राष्ट्रीय अन्नसुरक्षा अधिनियम, २०१३ अंतर्गत सामाविष्ट न झालेल्या एपिएल (केशरी) शिधापत्रिकाधारक शेतकरी लाभार्थ्यांना माहे जानेवारी २०२३ पासून अन्नधान्याऐवजी प्रतिमाह प्रति लाभार्थी रु. १५०/- इतक्या रकमेच्या थेट हस्तांतरणाची (Direct Benefit Transfer- DBT) योजना कार्यान्वित करण्यास मान्यता देण्यात आली असल्याने वरिल कागदपत्र दाखल करण्याचे आव्हान करण्यात आले आहे. तसेच प्रतिवर्षी किमान आधारभुत किंमतीत होणा-या वाढिनूसार केंद्र शासनाने अधिसूचित केलेल्या Cash Transfer of Food Subsidy Rules, २०१५ मधील तरतुदीनुसार प्रतिमाह प्रतिलाभार्थी सुधारित वाढिव रोख रक्म(पुढिल दशकाच्या पूर्णांकात) थेट हस्तांतरीत करण्यास मान्यता देण्यात आली असल्याने 
हिमायतनगर तालुक्यातील शिधापत्रिकाधारक शेतकरी लाभर्थ्यांना तालुका प्रशासना‌द्वारे आव्हान करण्यात येते की, माहे जानेवारी २०२३ पासून शेतकरी शिधापत्रिकाधारक लाभार्थ्यांना प्रतिव्यक्ती दरमहा रुः १५०/- प्रमाणे APL DBT योजने अंतर्गत अनुदान मिळाले नसतील अशा शेतकरी शिधापत्रिकाधारक लाभार्थी यांनी सदर योजनेचा लाभ मिळविण्यासाठी आपल्या शिधापत्रिकेची छायांकीत प्रती सोबत कुटुंब प्रमुखाचे बैंक खाते क्रमांक कुटुंबातील सर्व सदस्यांचे आधार कार्डची छायांकीत प्रत व ७/१२ उता-याची छायांकीत प्रती सोबत आपला अर्ज संबंधीत रास्तभाव दुकानदारा मार्फत अथवा आपन स्वतः तहसिल कार्यालय हिमायतनगर, येथिल पुरवठा विभागात येऊन त्वरीत सादर करावे असे तहसील कार्यालय पुरवठा अधिकारी प्रियंका धोटे यांनी सांगितले आहे

Post a Comment

0 Comments