Header Ads Widget

बरबड्याचे विद्यमान सरपंच माधव कोलगाने यांच्या कडून विकास कामाचा धुम धडाका चालूच प्रलंबित कामे ही पूर्ण !!

      माधव पवार 
नायगाव विधानसभा मतदारसंघाचे विद्यमान आमदार राजेश पवार यांच्या नेतृत्वाखाली बरबड्याचे विद्यमान सरपंच माधव कोलगाने यांच्या कडून विकास कामाचा धुम धडाका चालूच असून सदरीलच्या गावातील अनेक वर्षा पासून प्रलंबित कामे असलेले सदरच्या नवतरुण विद्यमान सरपंचानी पूर्ण केले असल्याचे स्पष्ट चित्र दिसून येत आहे नायगाव तालुक्यातील बरबडा हे गाव लोकसंख्येच्या संदर्भात पाहिले तर १५ ते १६ हजार लोकांच्या वस्तीचं गाव असलेल्या गावाचा विकास करण्यासाठी नायगाव विधानसभा मतदारसंघाचे विद्यमान आमदार राजेश पवार यांच्या माध्यमातून विकाससाच्या निधीसाठी मुंबईला जाऊन पाठपुरावा करून सदरच्या गावाला निधी प्राप्त करून घेऊन विकास कामाचा धुमधडाका विद्यमान सरपंच माधव कोलगाणे यांनी चालू  ठेवला आहे 

ग्रामपंचायत कार्यालय बरबडा अंतर्गत म्हणजे बरबडा नगरीत रस्त्याने व गल्ली बोळीत रस्त्याने केअर कचरा होऊ नये म्हणून व सदरील नागरिकांना घाहाणीचा काहीच प्रादुर्भाव होऊ नये म्हणून पंधराव्या वित्त आयोग अंतर्गत केर कचरा उचलण्यासाठी व बाहेर फेकून देण्यासाठी ग्रामपंचायत कार्यालयाला कचरा वाहतूक करणारा लोडिंग आटो सरपंच माधव कोलगाणे यांनी त्यांनी प्राप्त करून घेतला आहे 

Post a Comment

0 Comments