नांदेड जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक अबिनाश कुमार यांच्या आदेशानुसार नांदेडच्या ग्रामीण पोलीस ठाण्याच्या पोलीस अधिकार्यासह त्यांच्या पथकातील पोलीस कर्मचाऱ्यांनी हाय पावर कामगिरी बजावली असून मिसिंग मधील एका इसमाचा खून केल्या प्रकरणी दोन आरोपीला ग्रामीण पोलीस ठाण्याचे दमदार पोलीस निरीक्षक ओमाकांत चिंचोलकर यांनी गजाआड केले आहेग्रामीण पोलीस ठाण्याच्या अंतर्गत असलेल्या भायेगाव येथील एक इसम हरवला होता त्या मिसिंग मधली दत्ता हनमंत कोल्हे राहणार भायेगाव तालुका जिल्हा नांदेड यांचा दोन आरोपीनी खून केल्या प्रकरणी ग्रामीण पोलीस ठाण्याचे दमदार पोलीस निरीक्षक ओमाकांत चिंचोलकर यांच्यासह त्यांच्या विशेष पथकातील पोलीस कर्मचारी कौशल्य पूर्ण कामगिरी करून संशयित आरोपींना विश्वासात घेऊन विचार पूस केली आहे
सदरच्या प्रकरणातील मयत दत्ता हनुमंत कोल्हे यांचा धारदार शस्त्राने खून करून तुपा शिवारातील लोहेकर / खरवंडकर यांच्या शेतातील पाण्याच्या खदानित सदरचे प्रेत पोत्यात घालून व सिमेंटच्या खांबाला मोटार सायकल सह बांधून टाकून दिले असल्याची कबोली नांदेडच्या ग्रामीण पोलिसांना सदरच्या आरोपीने दिले असल्याचे सांगण्यात येत आहे
मिसिंग मधील इसमाचा खून केल्या प्रकरणातील आरोपीचे नाव विश्वनाथ गोपीनाथ कोल्हे आणि दुसरा आरोपी गणेश संजय कोल्हे राहणार भायेगाव तालुका जिल्हा नांदेड येथील रहिवासी आरोपी पुढील तपास ग्रामीण ठाण्याचे पोलीस करीत आहेत

0 Comments