Header Ads Widget

शेतकऱ्यासह बँक खातेदाराची केवायसी ही जाचक अट्ट रद्दच करावी केवायसी करत असताना अंगठा येत नसल्यामुळे शेतकऱ्याचे नुकसान !!

      माधव पवार 
राज्यातल्या दळभद्री सरकारने केवायसीची जाचक आट्ट लावून गोरगरीब शेतकऱ्यांना वेठीस धरले असून केवायसी करण्यासाठी गेलेल्या शेतकऱ्याचे ठसे येत नसल्यामुळे शेतकरी मोठ्या संकटात सापडला असताना सुद्धा या राज्यातल्या दळभद्री सरकारने केवायसीच्या बाबतीत तोडगा काढण्यासाठी तयार नसल्याचे स्पष्ट चित्र दिसून येत आहे 

बँक खात्याला आधार लिंक असताना मोबाईल लिंक कशासाठी लागते हा तेवढाच महत्वाचा प्रश्न शेतकऱ्यासह लाडक्या बहिणीला भेडसावत आहे

शेतकऱ्यांचा पुळका करणारे सरकार असल्याचे व शेतकऱ्यांच सरकार असल्याचे सांगतात परंतु एका बाजूने पुळका आणि दुसऱ्या बाजूला शेतकऱ्याला वेठीस धरण्याच काम ह्या राज्यातल दळभद्री  सरकार करत असल्यामुळे या सरकारने शेतकऱ्यावर लादलेली केवायसीची आट्ट रद्द करून तुमाम शेतकऱ्यांना गेल्या वर्षीचा पीक विमा व पंतप्रधान व मुख्यमंत्री योजनेचे पैसे मिळवून देण्यासाठी प्रयत्न करावेत अशी मागणी होत आहे 

ज्या शेतकऱ्यांची केवायसी झाली त्या शेतकऱ्याला तूटपुंजी पीक विम्याची मदत मिळाली परंतु इतर केवायसी करण्यास गेलेल्या शेतकऱ्याचे अंगठे येत नसलेल्यामुळे शेतकऱ्याला पिक विम्या पासून व पंतप्रधान आणि मुख्यमंत्री योजनेच्या हप्त्यापासून सरळ सरळ मुखावे लागले आहे 

मुख्यमंत्री लडकी बहीण योजनेच्या हप्त्यासाठी महिला वर्गाना सुद्धा बँकेत जाऊन केवायसी करावी लागत असल्यामुळे बँक अधिकाऱ्याच्या बेस जबाबदारपणामुळे सुद्धा केवायसी व्यवस्थित व लवकर केली जात नाही म्हणून ह्या राज्यातल्या दळभद्री सरकारने केवायसीची जाचक आट्टच रद्द करावी अशी मागणी जोर धरीत आहे

Post a Comment

0 Comments