Header Ads Widget

राज्यातील पंचायत समिती मधील संगणक परिचालकाचे थकीत मानधन तात्काळ द्या अशी ग्रामविकास मंत्री यांच्याकडे आमदार बाबुराव कदम यांची मागणी.

    नागोराव शिदे 
हिमायतनगर महाराष्ट्र राज्यातील ३६ जिल्ह्यातील जिल्हा परिषदेत प्रत्येकी ३ व ३५१ पंचायत समिती मध्ये प्रत्येकी १ अशी ४५९ संगणक परिचालक हे १५ वा केंद्रीय वित्त आयोगा अंतर्गत CSCE- GovernanceServicespvtitd या बाह्य यंत्रने मार्फत कार्यरत असलेले आणि आर्थिक वर्ष २०२०-२०२१ पासून चालू झालेल्या १५ वा केंद्रीय वित्त आयोग हा ३१ मार्च २०२५ ला संपत असून सदर योजनत कार्यरत असलेली आमच्या ४५९ कुटुंबाचे भविष्य हे पूर्णतः अंधारात दिसून येत आहे त्यामुळे १६ वा केंद्रीय वित्त आयोगात आमचे समावेशन करून घेऊन थकित बिल देण्यात यावे या मागणीसाठी हदगाव हिमायतनगर विधानसभेचे आमदार बाबुराव कदम कोहळीकर यांच्यासोबत राज्यातील  पंचायत समिती विभागाच्या शिष्टमंडळाने महाराष्ट्राचे ग्रामविकास मंत्री गोरे यांची भेट घेऊन त्यांच्याकडे विविध विषयाची मागणी केली आहे 
यावेळी आमदार बाबुराव कदम  कोहळीकर यांच्या मागणीला पाठिंबा देत ग्रामविकास मंत्री गोरे साहेब यांनी त्यांच्या दालनात दिनांक 21 - 1- 2025 रोजी सकाळी 11 वाजता CSCE - govarnanceservices pvtitd या संबंधित सर्व कर्मचाऱ्यांची बैठक आयोजित केलेली आहे, राज्यातील 459 संगणक परिचालक यांनी हर्ष उल्हासाने आमदार बाबुराव कदम कोहळिकर यांचे आभार मानून एक आशावाद व्यक्त केला आहे

Post a Comment

0 Comments