Header Ads Widget

राष्ट्रीयकृत बँकेचे नाव मोठे लक्षण खोटे त्या पेक्षा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचा कारभार सुरळीत !!

      माधव पवार 
राष्ट्रीयकृत बँकेचे नाव मोठे लक्षण खोटे त्या पेक्षा नांदेड जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचा कारभार सुरळीत चालत असून या बँकेचे सर्व खातेदार समाधान असल्याचे स्पष्ट चित्र दिसून येत आहे 

सर्वात महत्त्वाची बाब म्हणजे नायगाव तालुक्यातील नांदेड जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक शाखा कुंटूर ही शेतकऱ्याच्या बाबतीत एक प्रकारची संजीवनी असल्याचे बँकेच्या व कर्मचाऱ्यांच्या कामकाजावून दिसून येत आहे

राष्ट्रीयकृत बँका म्हणणाऱ्या बँकेचे नाव मोठे आणि लक्षण खोटे असून शेतकऱ्याच्या व बँक खातेदाराच्या सहमती शिवाय खातेदाराचे बँक खाते बॅलन्स असताना सुद्धा बंद करण्यात येऊ असा संताप जनक सवाल बँक खातेदाराने केला आहे 

राष्ट्रीयकृत बँकेतील शेतकऱ्यांचे व इतर लोकांचे बँक खाते आहेत त्या बँक खात्याच्या संदर्भात पाहिले तर अनेक समस्यांना बँक खातेदारांना तोंड द्यावे लागत आहे 

राष्ट्रीयकृत बँका म्हणून या बँके मध्ये अनेक शेतकऱ्या सह जनसामान्य माणसाचे बँक खाते आहेत परंतु या सदरच्या बँके मध्ये एकमेकाचा ताळमेळ लागत नसल्याने व शेतकऱ्यांचे समाधान होत नसल्यामुळे बँक खातेदारातून संताप व्यक्त केला जात आहे 

सध्याच्या परिस्थिती मध्ये नांदेड जिल्हा मध्यवर्ती बँकेचा कारभार अतिशय टकाटक चालत असल्यामुळे सदरच्या खातेदाराचे कोणत्याही अडचणी सांगून खाते बंद करण्यात आले नाहीत असे स्पष्ट चित्र दिसून येत आहे 

परंतु राष्ट्रीयकृत बँकेत बँक अधिकाऱ्याचा येथील बँक कर्मचाऱ्याच्या बेजबाबदार पणामुळे व मनमानी कारभारामुळे सदरचे खाते बंद करण्यात आले आहेत 

Post a Comment

0 Comments