Header Ads Widget

कुंटूरच्या जिल्हा मध्यवर्ती बँकेने चालू वर्षात १७ कोटी ४९ लाख ८५ हजार रुपये शेतकऱ्यांना केले वाटप तर पाच कोटी ९० लाख ६५ हजार रुपये शेतकऱ्याकडे थकबाकी - शाखा अधिकारी लांडगे यांची माहिती !!

      माधव पवार 
नांदेड जिल्हाच्या नायगाव तालुक्यातील कुंटूर येथील नांदेड जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या एकूण १६ हाजार ३०१ खातेदाराला या सदरच्या बँकेचे शाखा अधिकारी जी.एस लांडगे यांनी चालू वर्षात म्हणजे सन २०२४ ते २०२५ सालात एकूण १७ कोटी ४९ लाख ८५ हजार रुपये शेतकऱ्यांना वाटप केले आहे 

या बँकेचे तत्कालीन शाखाधिकारी एम आर हंगरगे यांच्यासह तत्कालीन शाखाधिकारी वानोळे यांनी ही अशाच पद्धतीने सदरची बँक चालवून शेतकऱ्याचे समाधान करून शासकीय अनुदान असो की पीक विमा असो अथवा बँके कडून कर्ज वाटप असो थकबाकी वसुली असो चांगल्या पद्धतीने करून घेतली होती 

तर पाच कोटी ९० लाख ६५ हजार रुपये शेतकऱ्याकडे थकबाकी असल्याचे बँकेचे शाखा अधिकारी लांडगे यांनी माहिती दिली आहे 

तालुक्यातील कुंटूरच्या जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे एकूण सभासद म्हणून २ हाजार ९४० आहेत यापैकी चालू खातेदार २ हाजार २८७ आहेत यापैकी ६५३  शेतकरी थकबाकीदार आहेत 

सदरच्या शेतकऱ्या कडुन ५ कोठी ९० लाख ६५ हाजार ६९४ रुपये येणे बाकी असल्याचे नांदेड जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक कुंटूर शाखा अधिकारी लांडगे यांनी सांगितले आहे 

नांदेड जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक कुंटूर येथे बँकेत अपुरे कर्मचारी असले तरी सदरच्या बँकेचे शाखाधिकारी लांडगे यांनी सदरचा कारभार चांगल्या प्रकारे हाताळत असल्याने सदरची बँक ही शेतकऱ्यांसाठी संजीवनी बनत असल्यामुळे शेतकरी वर्ग मोठ्या प्रमाणात समाधान आहेत 

कुंटूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे एकूण सभासद व खातेदार १६ हाजार ३०१ असल्यामुळे या पैकी ९ हाजार १०० शेतकऱ्याचे व सभासद यांचे आधार लिंक असल्यामुळे शेतकऱ्यांना कोणत्या ही अडचणीचा सामना करावा लागत नाही असे स्पष्ट चित्र या बँकेत दिसून येत आहे 

सदरच्या बँकेच्या संदर्भात शाखाधिकारी गणेश संभाजी लांडगे यांनी कसल्याची अडचण भासू देत नसल्यामुळे सदरच्या बँकेचा आर्थिक व्यवहार सुरळीत चालत असल्याचे शेतकऱ्यातुन बोलून दाखवित आहेत

Post a Comment

0 Comments