नायगाव तालुक्यातील रहिवासी असलेले चंद्रकांत सूर्यतळ यांना मिंमासा फाउंडेशन, दै.समीक्षा व महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघ आणि मंथन क्रिएटिव्ह ग्रुप पत्रकार प्रेस परिषदेच्या वतीने देण्यात येणारा स्व.डॉ शंकरराव चव्हाण विकास पत्रकारिता ग्रामीणपत्रकारिता पुरस्कार दै. सकाळ या वृतपत्राचे नायगाव तालुक्यातील बरबडा बातमीदार चंद्रकांत सुर्यतळ यांना जाहीर झाला आहे.
पत्रकार चंद्रकांत सुर्यतळ यांनी पत्रकारितेच्या माध्यमातून अनेक दिवसा पासून सामजिक प्रश्न सोडवण्यासाठी आणि उपेक्षितांना न्याय देण्याचे काम केले आहे
ग्रामीण भागात परखड पत्रकारिता करत त्यांनी अनेक सामाजिक प्रश्न निर्भीडपणे लेखणीच्या माध्यमातून सोडविले आहेत
त्यांच्या या कार्याची दखल घेऊन सदरील पुरस्कारासाठी त्यांची निवड करण्यात आली आहे.
दिनांक ५ जानेवारी रोजी मान्यवरांच्या हस्ते नांदेड येथील मिनी सह्याद्री विश्रामगृह येथे या पुरस्काराचे वितरण होणार आहे.
हा पुरस्कार जाहीर झाल्या बद्दल मित्र परिवार यांच्यातून त्याचे अभिनंदन होत आहे.

0 Comments