ग्रामीण पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये बळीरामपूर चौक आणि बळीरामपूर मुख्य रस्ता व अंतर्गत रस्त्यावर मोठ्या प्रमाणात अतिक्रमण झालेले होते अशाच पद्धतीने पानटपऱ्या पत्राचे शेड उभारून अवैध्य व्यवसाय केलेजात होते
तत्कालीन नायगाव पोलीस ठाण्याचे तथा लोहा पोलीस ठाण्याचे दमदार पोलीस निरीक्षक ओमाकांत चिंचोलकर यांनी या ठिकाणी कार्यरत असताना सुद्धा अशाच पद्धतीच्या अतिक्रमांना हटाव मोहीम हत्ती घेऊन चांगल्या पद्धतीने राबवली आहे
असे पत्राचे शेड उभारून त्याच्यामध्ये अवैध दारू विकणे, मटका बुकी,जुगार चालवणे गुटखा विकणे प्रतिबंधित तंबाखू विकणे अशा प्रकारचे अवेद्य व्यवसाय चालू होते. अनेक वेळा गुन्हे दाखल करूनही त्यांच्यावर फरक पडत नव्हता.
रोडच्या लगत पानपट्टी टाकून पत्राचे शेड उभारून अवैधपणे त्या ठिकाणी लोकांना गोळा केले जात होते गुन्हेगार वृत्तीचे व व्यसनाधीन आरोपी अशा ठिकाणी बसून गोळा होऊन गुन्हे करण्याचे नियोजन करत होते अशा ठिकाणी बसून आपापसात झगडे भांडण करून वाद करून घेत होते.
मागील आठवड्यामध्ये याच ठिकाणी गुन्हेगार एकत्र येऊन त्यांच्यात वाद होऊन तीन सराईत गुन्हेगारांनी मिळून एका गुन्हेगाराचा खून केला होता
गुन्हेगारीवर प्रतिबंध बसावा गुन्हेगारी वृत्तीचे बसण्या उठण्याचे ठिकाणे त्यांचे जमण्याचे ठिकाणे व्यसन करण्याचे ठिकाणे समूळ पणे नष्ट करून गुन्हेगारी वृत्तीच्या मुळा पर्यंत जाऊन ग्रामीण पोलीस ठाण्याचे सिंघम पोलीस निरीक्षक ओमाकांत चिंचोलकर यांनी सदरचे अड्डे ही उधवस्त केले आहे
अवैध धंद्याचा दारू मटका यांचा कायमस्वरूपी बंदोबस्त करण्याच्या उद्देशाने व गुन्हेगारी रोखण्यासाठी ग्रामीण पोलिसांनी एमआयडीसी यांच्याशी पत्रव्यवहार करून त्यांची मदत घेऊन अतिक्रमण मोहीम राबवली आहे
यामध्ये आज रोजी तीन दारू विक्रीचे पत्राचे शेड, दोन मटका बुकीचे शेड व इतर १२ पानपट्टी व पत्राचे शेड काढण्यात आले
सध्याचे ग्रामीण पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक ओमाकांत चिंचोलकर यांनी त्यांच्या कार्यकाळात रस्ते वाहतुकीसाठी अगदी मोकळे झाले होते तशाच पद्धतीने ग्रामीण पोलीस ठाण्याचा पदभार स्वीकारल्यांच्या नंतर ठाण्याच्या अंतर्गत येणाऱ्या रस्त्यावरील अतिक्रमण हटाव मोहीम प्रभावीपणे राबविण्यासाठी मोठे प्रयत्न केले आहे
.

0 Comments