नांदेड जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक अबिनाश कुमार यांनी नांदेड शहरातील तसेच जिल्ह्या मध्ये शांतता व सुव्यवस्था आबाधित ठेवण्यासाठी व राहण्यासाठी नांदेड जिल्ह्यातील गुन्हे अभिलेखा वरील सक्रिय तसेच वारंवार गुन्हे करणाऱ्या सराईचा आरोपीची यादी तयार करण्यात आली आहे
जिल्हाचे पोलीस अधीक्षक अबिनाश कुमार यांनी सर्व पोलीस ठाण्याच्या पोलीस अधिकाऱ्याला सूचना दिल्या नुसार आप्पर पोलीस अधीक्षक खंडेराय धरणे, आप्पर पोलीस अधीक्षक सूरज गुरव, उपविभागीय पोलीस अधिकारी सुशील कुमार नायक इतवारा यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस यंत्रणा काम जिल्ह्यात काम करीत आहे
ग्रामीण पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक ओमाकांत चिंचोलकर यांनी आरोपी अतिश गंगाधर शिंदे यांच्या विरुद्ध प्रतिबंधक उपाय योजना करून त्यांना एका वर्षासाठी स्थानबद्ध केले आहे
पोलीस अधीक्षक अबिनाश कुमार यांनी कारवाई करण्याच्या संबंधाने सर्व पोलीस ठाणे प्रभारी अधिकारी यांना सूचना दिल्या होत्या त्या नुसार ग्रामीण पोलीस ठाण्याचे दबंग पोलीस निरीक्षक चिंचोलकर यांनी ही सदरची दमदार कामगिरी केली आहे
नांदेड जिल्ह्यातील गुन्हेगारावर वारंवार प्रतिबंधात्मक कारवाई करून सुद्धा त्यांच्या वर्तनात सुधारणा होत नसल्याने नांदेड जिल्ह्यातील सर्व पोलीस ठाणे दारा कडून गुन्हेगारांना स्थानबद्ध सराईत गुन्हेगारांना कारागरा मध्ये स्थानबद्ध करण्यात आले आहे
तसेच शहरात व जिल्ह्या मध्ये शांतता व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी व ठेवण्यासाठी तसेच कायद्याचा आदर करणाऱ्या नागरिकांना त्रास देणारे गुन्हेगारावर पोलिसांची बारकाईने नजर आहे
अशा सराईत गुन्हेगारा कडून त्या नागरिकांना विनाकारण त्रास होत असल्यामुळे आणखी एका आरोपीला म्हणजे अतिष गंगाधर शिंदे राहणार धनेगाव तालुका जिल्हा नांदेड येथील रहिवासी हा सदरचा आरोपी आहे
अशा आरोपीला एका वर्षासाठी स्थानबद्ध सारखी कठोर कारवाई करण्यात येत आहे

0 Comments