नांदेड जिल्हाच्या नायगाव तालुक्यात शासकीय सेवेत उल्लखनीय कामगिरी वं कार्यप्रणाली अतिशय चोख पद्धतीने सांभाळून या नायगाव तालुक्यातील ग्राम सेवक संघटना एकत्रित पणे घेऊन चालणारे एक खुशल नेतृत्व असलेले टी.जी.रातोळीकर यांची नायगाव तालुका ग्रामसेवक संघटनेच्या अध्यक्ष पदी तर सूर्यकांत बोंडले सचिव पदी निवड करण्यात आली आहे
शासकीय सेवेत काम करत असताना ज्या गावात कार्यरत असताना सुद्धा एक नायगाव तालुक्यासाठी शासकीय कर्मचाऱ्यांची दमदार संघटना म्हणजे ग्रामसेवक संघटना सदरची संघटना ही मोठ्या हिमतीने काम करत आहे
नेमून दिलेल्या गावाचा कारभार सांभाळात तालुक्याची संघटना चांगल्या प्रकारे चालविण्यासाठी मोठे प्रयत्न करावे लागत असून शासकीय सेवेत काम करीत असताना अनेक कर्मचाऱ्याला अनेक वेळा अनेक समस्यांना सामोरे जावे लागते आहे
त्या संघटनेच्या माध्यमातून आपल्या कर्मचाऱ्यांवर कसल्याच प्रकारचा ताण तणाव येऊ नये म्हणून सदरची संघटना ही या नायगाव तालुक्यात मोठ्या जबाबदारीने काम करत आहे
या सदरच्या ग्रामसेवक संघटनेचे अध्यक्ष असलेले कुशल नेतृत्व टी जी रातोळीकर या संघटनेच्या माध्यमातून काम करणारे व नूतन जाहीर झालेल्या नायगाव तालुका ग्रामसेवक संघटनेच्या सचिव पदी निवड झालेले सूर्यकांत बोंडले या कुशल नेतृत्वाची जोडी या संघटनेच्या माध्यमातून काम करीत आहे

0 Comments