Header Ads Widget

अनिल अमृतवार यांची पतंजलीच्या राज्य प्रभारी पदी निवड पतंजली योग परिवार नांदेडच्या वतीने भव्य सत्कार

 नांदेड/प्रतिनिधी.. प्रल्हाद आयनेले सर 
परमपूज्य स्वामी रामदेव महाराज यांच्या सानिध्यात हरिद्वार येथे १ते ५ जानेवारी दरम्यान राज्य कार्यकारिणीच्या बैठकीत  अनिल अमृतवार यांना महाराष्ट्र राज्य पूर्व च्या १८ जिल्ह्यासाठी पतंजली योग समिती राज्य प्रभारी पदी नियुक्ती करून त्यांना मोठी जबाबदारी देण्यात आल्याने नांदेड येथील येथील योग परिवारातर्फे प्रसिध्द उद्योजक अनिल शेटकार यांच्या पुढाकारातून अनिल लॉन्स येथे रविवारी सायंकाळी भव्य सत्कार करण्यात आला.
अनिल अमृतवार हे बी कॉम, एमबीए उत्तीर्ण असून ते २००५ पासून पतंजलीचे कार्य करतात, त्यांनी योगसाधक, योग शिक्षक, जिल्हा प्रभारी, सहराज्य प्रभारी अशी जबाबदारी सांभाळली आहे. 
‌अनिलजी शेटकार यांनी अनिल अमृतवार यांच्या कार्याची दखल घेऊन राज्य प्रभारी पदी नियुक्ती करण्यात आली आहे . अनिल अमृतवार यांच्या कार्याबाबत उद्योजक अनिल शेटकार, योगाचार्य सिताराम सोनटक्के, सोपान काळे, पंढरीनाथ कंठेवाड, राम शिवपनोर,णसदाशिवराव बुटले पाटील, हनुमंत ढगे आदींनी अनिल अमृतवाणी यांच्या कार्यावर प्रकाश टाकला. कार्यक्रमाचे महारुद्र माळगे यांनी सूत्रसंचालन केले. कार्यक्रमास डॉ. रमेश नारलावार, शिवाजीराव शिंदे, अनिल कामीनवार, कैलास जाधव, राजेंद्र शंकरपुरे, एकनाथ पाटील, सदाशिवराव बुटले, दिगंबर पाटील, शंकर परकंटे, भगवान कीडे, बाबुराव उपलंचवार, ईश्वर दासे, मकरंद पांगरकर, शिवाजी पेन्सलवार, रामकृष्ण चक्रवार, दिगंबर कल्याणे, सुधाकर चेरकुला, अनिल अनेराये, परशुराम धरमी, भगवानराव पाटील, माधवराव नरंगलकर, विनायक सितापराव, निशांत गोत्रे, सोपान काळे, किशन भवर, शुभम भवर,  देवेश सलगरकर, भागोराव कगेवाड, राम आचमवाड, लक्ष्मीकांत आनलदास, प्रल्हाद आयनेले, चिंचोलकर रामेश्वर, नागरे तुकाराम, बाळकृष्णजी, पंकज आयनेले ,शंकरराव मुलंगे, प्रभाकर डांगे, प्रवीण पाठक, सुनीता डांगे, गोविंद विश्वनाथ डांगे, विभावरी देशमुख, प्रतिभा पाटील, पंडित पाटील, नामदेवराव मोहिते, निळकंठ मोरे, नितीन चव्हाण, व्यंकटराव कल्याणपाड, रावसाहेब साजने, बापूराव मोर, राम रंगनानी, मिलिंद कुलकर्णी आदी मान्यवर उपस्थित होते. कार्यक्रमाचे सांगता अल्पोपहाराने करण्यात आली.

Post a Comment

0 Comments