हिमायतनगर तालुक्यातील संजय गांधी व श्रावणबाळ योजनेतील पात्र लाभार्थ्यांनी आपले आधार कार्डशी मोबाईल क्रमांक लिंक करून बँक पासबुक व मोबाईल क्रमांक खालील दिलेल्या वेळेमध्ये तहसील कार्यालय हिमायतनगर येथे सादर करावे असे प्रेस नोट द्वारे तहसीलदार सौ पल्लवी टेमकर यांनी सांगितले आहे सविस्तर असे की माननीय सचिव सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभाग मंत्रालय मुंबई यांनी संजय गांधी निराधार अनुदान योजना व श्रावणबाळ सेवा राज्य निवृत्तीवेतन योजनेच्या लाभार्थ्यांना अर्थसहाचे वितरण डीबीटी द्वारे करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे त्या अनुषंगाने माननीय जिल्हाधिकारी अभिजित राउत नांदेड यांनी माहे फेब्रुवारी २०२५ पासूनचे अर्थसहाय्य केवळ डीबीटी पोर्टलवर आधार व्हॅली डेट झालेल्या लाभार्थ्यांना देण्यात येणार आहे असे सक्त निर्देश दिले असल्याने हिमायतनगर तालुक्यातील काम पूर्ण करण्याच्या उद्दिष्टेने मंडळ निहाय आहे की नियोजन करण्यात येत असून आपल्या तालुक्यातील पात्र लाभार्थ्यांनी आधार कार्डशी मोबाईल क्रमांक आधार सेंटरवर जाऊन लिंक करून बँक पासबुक खात्याची झेरॉक्स आणून चालू मोबाईल नंबर तसेच हयात प्रमाणपत्र यापूर्वी सादर केले नाही त्यांनी सलग्न करणे साठी तहसील कार्यालय हिमायतनगर येथे कॅम्प आयोजित केला आहे त्या कॅम्पमध्ये हिमायतनगर मंडळातील लाभार्थ्यांनी दिनांक ३० १. २०२५ ते ३१. १. २०२५सकाळी ११ ते ५ वाजेपर्यंत आपले कागदपत्र सादर करायचे आहे ,सरसम बु मंडळतील दिनांक ३. २. २०२५ ते ४. २. २०२५ वेळ सकाळी ११ ते ५ पर्यंत तसेच जवळगाव मंडळातील दिनाक ५. २. २०२५. ६. २. २०२५. रोजी सकाळी ११ ते ५ पर्यंत आपले सर्व कागदपत्रे वरील प्रमाणे दाखल करायचे आहे सदरील माहिती सादर न केलेल्या लाभार्थ्यांचे अनुदान बंद करण्याबाबत शासनाचे स्पष्ट निर्देश आहेत याबाबत सर्व लाभार्थ्यांनी नोंद घ्यावी व आपले कागदपत्र व नमूद केलेल्या कॅम्पच्या दिनांकावर आपण स्वतः हजर राहून आधार संलग्न मोबाईलसह हजर राहावे असे आवाहन हिमायतनगर च्या तहसीलदार सौ पल्लवी टेमकर यांनी केले आहे यावेळी नायब तहसीलदार सूर्यकांत ताडेवाड, एम झेड सिद्दिकी सहाय्यक महसूल अधिकारी ,ऑपरेटर आकाश गुंडेकर यांची यावेळी उपस्थिती होती

0 Comments