नायगाव तालुक्यात एकूण १९० शाळा असल्यामुळे या सर्व शाळेतील विद्यार्थ्यांच्या शिक्षणाची गुणवत्ता वाढविण्यासाठी शाळेच्या मुख्याध्यापकासह शिक्षकांनी विद्यार्थ्यांच्या शिक्षणाकडे मोठे लक्ष देण्याची गरज भासत आहे
शाळेतील शिक्षकांनी आपापल्या शाळेतील विद्यार्थ्यांचा अभ्यास घेऊन सिलाबस पूर्ण करून घ्यावेत असे नायगावचे कर्तव्य गटशिक्षण अधिकारी संग्राम कांबळे यांनी नायगाव फास्ट न्यूजशी बोलताना सांगितले आहे
तालुक्यातील अनेक शाळेवर नायगावचे गट शिक्षणाधिकारी जाऊन प्रथम विद्यार्थ्यांची गुणवत्ता तपासतात आणि विद्यार्थ्यांची गुणवत्ता अधिक वाढावी म्हणून सूचना ही शिकणा करीत आहे
एक शिक्षण प्रेमी असलेले कर्तव्यदक्ष गटशिक्षणाधिकारी संग्राम कांबळे यांचे तालुक्यातील शाळेवर लक्ष असल्यामुळे शिक्षक वर्ग शाळेवर जाण्यासाठी लेट लतीफ करीत नसल्याचे स्पष्ट चित्र दिसून येत आहे
शाळा ही विद्यामंदिर असल्यामुळे विद्यार्थ्यांच्या शिक्षणात मोठी वाढ होण्यासाठी गटशिक्षणाधिकारी संग्राम कांबळे यांनी प्रयत्न करीत आहे
आपल्या शाळेतील विद्यार्थी हा परीक्षा देत असताना कॉपीमुक्त परीक्षा दिला पाहिजे अशा पद्धतीचा अभ्यास करून घेणे अत्यंत गरजेचे असल्याचे ही गटशिक्षणाधिकारी कांबळे यांनी सांगितले आहे
शाळेवर शिक्षकांनी विद्यार्थ्यां कडून वाचन करून घेतले पाहिजे व विद्यार्थ्यांच्या डोक्याला ताण तणाव निर्माण होऊ नये म्हणून शिक्षकांनी शाळेत विविध कार्यक्रमाचे आयोजन करून सुद्धा विद्यार्थ्यांच्या बुद्धीला तेज मिळवून द्यावी असेही गटशिक्षणाधिकारी संग्राम कांबळे यांनी सांगितले आहे

0 Comments