Header Ads Widget

राजकारणातील बुलंद तोफ मा.शिवराज पाटील होटाळकर यांच्यासह शेकडो कार्यकर्ते राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश करण्यासाठी मुबंईला रवाना : पक्ष प्रवेश उद्या !!

      माधव पवार 
नांदेड जिल्ह्यातील नायगाव तालुक्यातील राजकारणातील बुलंद तोफ होटाळकर म्हणून राजकीय क्षेत्रात ओळख व धमक असलेले नांदेड जिल्ह्या परिषदेचे माजी शिक्षण सभापती शिवराज पाटील होटाळकर यांचा मुबंईत उद्या जाहीर प्रवेश होणार आहे
राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश करण्यासाठी यांच्यासह शेकडो कार्यकर्ते दिनांक २२ जानेवारी २०२५ रोजी मुबंईला रवाना झाले आहेराष्ट्रवादी काँग्रेस पार्टी राष्ट्रीय अध्यक्ष महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री अजित दादा पवार यांच्या नेतृत्वात नांदेड जिल्ह्याचे माजी खासदार प्रताप पाटील चिखलीकर यांच्या मार्गदर्शनाखाली माजी शिक्षण सभापती तथा अर्थ सभापती जिल्हा परिषद नांदेड व सहसचिव व कमिटी अध्यक्ष नायगाव विधानसभा मतदारसंघ यासह प्रवेश करणार आहेत 

नायगाव विधानसभा मतदार संघातील शकडो कार्यकर्ते माजी शिक्षण सभापती शिवराज पाटील होटाळकर यांच्या बरोबर राष्ट्रवादी काँग्रेस मध्ये प्रवेश करणार आहेत 

नांदेड जिल्ह्याच्या नायगाव तालुक्यातील ग्रामपंचायत सदस्य मार्केट कमिटी संचालक सरपंच व ग्रामपंचायत सदस्य सेवा सहकारी सोसायटीचे चेअरमन सदस्य तंटामुक्त अध्यक्ष व सदस्य युवा उद्योजक विविध पक्षांचे पद अधिकारी यांचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात जाहीर प्रवेश होणार असल्याची माहिती देण्यात आली आहे

मा. शिवराज पाटील होटाळकर मित्र मंडळाच्या वतीने देण्यात आली आहे 

Post a Comment

0 Comments