नायगाव तालुक्यातील खेड्या पाड्यात असो नायगाव शहरात असो जवळ पास पात्र लाभार्थाना १० हाजार ७१५ पंतप्रधान आवास योजने अंतर्गत घरकुल मंजूर करण्यात आल्याची माहिती मिळत असली तरी या बांधकामासाठी लागणारी व शासनाच्या मार्फत मिळणारी रेती कधी ? उपलब्ध करून देणार असा सवाल लाभार्थानी प्रशासनाला केला आहे तालुक्यातील गोरगरीब पात्र लाभार्थाना पंतप्रधान आवास योजना असो रमाई आवास योजना असो त्या अंतर्गत घरकुल दिले जाते परंतु घरकुल बांधकासाठी रेती रेती मिळत नाही मिळाल्यास अवैध रेती धारकाकडून चढ्या दराने उपलब्ध असलेली रेती मिळते परंतु शासनाला कडून मिळणारी रेती का ? मिळत हा महत्वाचा प्रश्न आहे
नायगाव तालुक्यात पंतप्रधान आवास योजनेचे घरकुल १० हाजार ७१५ मंजूर असतील तर मग रेती बांधकामासाठी कधी ? उपलब्ध करून देणार असा लाभार्थानी प्रशासनाला सवाल केला आहे
नायगावच्या महिला तहसीलदार डॉ. धम्म प्रियाताई गायकवाड यांच्या कडे हा महसूल विभाग येत असल्यामुळे त्यांना रेती उपलब्ध करून देण्याचा अधिकार असल्यामुळे त्यांनी घरकुल बांधकाम करण्यासाठी लाभार्थाना तात्काळ रेतीची व्यवस्था करून देणे गरजेचे आहे
नायगाव पंचायत समितीचे गटविकास अधिकारी एल आर वाजे यांनी सुद्धा नायगावच्या तहसीलदाराकडे घरकुल बांधकामासाठी तात्काळ रेती उपलब्ध करून देण्यासाठी पाठपुरावा करणे गरजेचे आहे
या दोन्ही जबाबदार अधिकाऱ्यानी रेती उपलब्ध करून देण्यासाठी प्रयत्न करावेत अशी मागणी घरकुल लाभार्थानी केली आहे

0 Comments