Header Ads Widget

आंतरगाव येथे खंडोबा यात्रेच्या निमित्ताने जंगी कुस्त्याची तुफानी दंगल -

माधव पवार /  रामराव पाटील ढगे 
नायगाव तालुक्यातील मौजे आंतरगाव येथे दर वर्षी प्रमाणे या ही वर्षी श्री खंडोबा यात्रेच्या निमित्ताने समस्त गावकऱ्याच्या व ग्रामपंचायत कार्यालयाच्या वतीने दिनांक १ जानेवारी २०२५ रोजी जंगी कुस्त्याचा चांगलाच फड रंगला आहे 
आंतरगावच्या सरपंचाचासह समस्त यामध्ये गावकऱ्यानी प्रथम छोटया मुलाच्या म्हणजे लहान मुलाच्या कुस्त्या लावल्या आहेत 
तालुक्यातील आंतरगाव येथील समस्त गावकऱ्यानी श्री खंडोबा यात्रेच्या निमित्ताने जंगी कुस्त्याचा सामना गावात आयोजित केले आहे
कुस्त्याच्या अनुषंगाने गावातील प्रतिष्ठित नागरिक सरपंच उपसरपंच पोलीस पाटील तंटामुक्ती अध्यक्ष व ग्रामपंचायत कार्यालयाचे सदस्य आणि गावातील पैलवान यांनी कुस्त्या रिंगणात मोठया हिरारीने सहभाग घेऊन कुस्त्याची दंगल घडवून आणले आहे मौजे आंतरगाव येथील गावचे सरपंच गजानन पाटील तोडे यांच्यासह पोलीस पाटील यशवंत पाटील तंटामुक्तीचे अध्यक्ष प्रकाश पाटील यांच्यासह समस्त गावातील प्रतिष्ठित नागरिक यांनी श्री खंडोबा रायाची यात्रा मोठया थाटाने साजरी दरवर्षी करीत आहेत 

कुंटूर पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक राम कृष्ण श्रीहरी पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली फौजदार सोनवणे यांच्या सुचने नुसार जेमादार सुवर्णकार भार्गव यांनी कुस्त्याच्या निमित्ताने मोठा बंदोबस्त ठेवला आहे

Post a Comment

0 Comments