नांदेड येथे दिनांक ४ डिसेंबर २०२४ रोजी साडे पाच वाजण्याच्या व सहा वाजण्याच्या दरम्यान जुडीयो दुकाना समोर नांदेड येथे यातील अनोळखी दोन्ही आरोपीने फिर्यादीस आम्ही पोलिस आहोत असे भासवून पुढे गोवर्धन घाट ब्रिजवर चोऱ्या होत असल्याची तोतया पोलीसांनी बतावणी मारून फिर्यादी कडील दागिने घेऊन पसार झाला असल्याची घटना वजीराबाद पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडली आहे
यातील आरोपीने फिर्यादीस तुमच्या अंगावरील सोन्याचे दागिने पुडीत बांधून ठेवा असे सांगून फिर्यादीच्या जवळील दागिने कागदाच्या पुढील बांधून ती पुडी फिर्यादी कडे देत असताना आरोपीने हात चालाकेने सोन्याचे दागिन्याची पुडी स्वतः जवळ ठेवून घेतले आहे
आरोपी कडील कागदाच्या पुडीत खडे बांधून असलेली दगडाची पुडी बांधून असलेली पुडी फिर्यादी देऊन सदरील फिर्यादीची सोन्याची चैन दोन तोळे वजनाची किंमत ८० हजार रुपयाची व पाच ग्रॅमची सोन्याची अंगठी त्यावर बारीक खडा असलेली किंमत वीस हजार रुपयाची असा एकूण एक लाख रुपयाचा ऐवज घेऊन फसवणूक केली आहे
सदरील घटनेतील दोघे आरोपी सदरच्या मोक्यावर
पळून गेले असल्यामुळे फिर्यादी रामप्रसाद पिता छगनलाल शर्मा वय ६२ वर्षे व्यवसाय व्यापार राहणार नरसिंह मंदिराच्या पाठीमागे कवठा नांदेड यांनी दिलेल्या फिर्यादी वरून पोस्टे वजीराबाद पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला सदरील घटनेचा पुढील तपास पोहेका गव्हाणकर हे करीत आहेत

0 Comments