नायगाव तालुक्यातील कुंटूर येथील जिल्हा परिषद हायस्कूलच्या प्रांगणात दिनांक २५ डिसेंबर २०२४ रोजी संविधान जागृती समितीच्या वतीने संविधान जागृती महोत्सव सोहळ्याचे दिनांक २५ डिसेंबर रोजी आयोजन करण्यात आल्याची माहिती पत्रकार धडेकर यांनी नायागांव फास्ट न्यूजशी बोलताना दिली आहे
नायगावचे तहसीलदार श्रीमती डॉ.धम्मप्रिया गायकवाड यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न होणार असून प्रमुख व्याख्याते विठ्ठल कागणे सर ,जेष्ठ वक्ते अँड विजय गोणारकर यांचे संविधानावर आधारित सखोल असे मार्गदर्शन लाभणार आहे.
या कार्यक्रला प्रमुख पाहुणे म्हणून बिलोलीचे उपविभागीय अधिकारी मा.क्रांती डोंबे म्याडम ,धर्माबाद चे उपविभागीय अधिकारी मा.स्वाती दाभाडे म्याडम , बिलोलीचे उपविभागीय पोलीस अधिकारी रफिक शेख ,नायगावचे गटविकास अधिकारी एल.आर.वाजे , सपोनि.आर.एस पाटील,कुंटूर चे माजी सरपंच रुपेश देशमुख कुंटूरकर ,युवा उद्योजक कैलास बोंडले आदींची प्रमुख उपस्थिती राहणार आहे.
जनमानसात भारतीय संविधान व आपले हक्क आणि कर्तव्य याबद्दल अनेकांना जानिव नसल्याने अशा नागरिकांची जागृती व्हावी या उद्देशाने संविधान जागृती महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे
या कार्यक्रमास कुंटूर परिसरातील सर्व धर्माच्या नागरिकांनी व संविधान प्रेमी जण हजारोंच्या संख्येने सहभागी व्हावे असे आव्हान संविधान समितीच्या वतीने करण्यात आले आहे.

0 Comments