Header Ads Widget

नायगावच्या गटशिक्षणाधिकाऱ्यानी केला सावरखेडच्या जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत पत्रकारांचा सत्कार !!

माधव पवार / रामराव पाटील ढगे - 
नायगाव तालुक्यातील सावरखेड जिल्हा परिषद शाळे मध्ये केंद्र स्तरीय शिक्षण परिषदेचे आयोजन करण्यात आले होते या कार्यक्रमात बोलताना नायगावचे गटशिक्षणाधिकारी संग्राम कांबळे यांनी म्हणाले की पत्रकारांच्या लेखणी मधून समाजात घडत असलेले वास्तव चित्र समोर येते असे ते म्हणाले आहे 

तालुक्यातील सावरखेडच्या जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत एकूण १४ शाळेच्या वतीने केंद्र स्तरीय शिक्षण परिषदेचे आयोजन मुख्याध्यापक भाऊराव कानोले यांनी केले होते यावेळी पत्रकार रामराव पाटील ढगे व माधव पवार यांचा गटशिक्षण अधिकारी संग्राम कांबळे हस्ते सत्कार करण्यात आला आहे 

सावरखेडच्या जिल्हा परिषद शाळेत आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमाचे आयोजन शाळेचे विद्यमान मुख्याध्यापक भाऊराव पुंडलिकराव कानोले यांनी केले होते या सदरच्या कार्यक्रमां मध्ये अनेक विषय ठेवण्यात आले होते 

यावेळी सावरखेड येथे आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमाला एकूण १४ शाळेचे मुख्याध्यापक व शिक्षक आले होते यात घुंगराळा येथील अनकाडे, वारघडे व्यंकटराव जाधव एम डी शिंदे लक्ष्मण मुंडकर यांच्यासह काहाळा खुर्द वंजारवाडी बळेगाव ईकळीमाळ ताकबीड निळेगव्हण कृष्णूर तांडा मांडणी जयभवानी कृष्णूर वाघमारे सरस्पती सातेगाव संत बाळगीर महाराज काहाळा आदी शाळेचे मुख्याध्यापक व शिक्षक यावेळी उपस्थित होते 

यावेळी बोलताना नायगावचे गटशिक्षणाधिकारी म्हणाले की पत्रकारांच्या तुफानी लेखणी मधून समाजाला न्याय मिळतो आणि दिशा ही मिळतो असे ते म्हणाले आहे 

शहरी भागातला पत्रकार असो की ग्रामीण भागातला पत्रकार असो त्यांची वास्तव धारदार लेखणी चालत असल्यामुळे आज समाज कुठे तरी जागृत होत आहे 

गटशिक्षण अधिकारी संग्राम कांबळे म्हणाले की भारतीय राज्य घटनेचे शिल्पकार भारत रत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी पत्रकाराला भारतीय राज्य घटनेत मोठे स्थान दिले असल्यामुळे पत्रकाराला घटनेचा चौथा आधारस्तंभ अस म्हटले असल्याचे संग्राम कांबळे 
म्हणाले आहे

सदरील कार्यक्रमासाठी शाळेचे मुख्याध्यापक भाऊराव कानोले यांच्यासह संजय गंगाराम ठक्करवाड सतीश दिंगाबर जानकर, श्रीमती पदमजा पांडुरंग देवर्षे, श्रीनिवास हौसाजी जाधव, गोविंद मारोती बालाजीराव मारोती किशवे मारोती हणमंतराव चंदनकर श्रीमती अरुणा संगमनाथ शिरामने उमाकांत शंकरराव बा-हाळे यांनी मोठा परिश्रम घेतला आहे

नारायण पाटील ढगे सदाशिव शंकवाड शिक्षण अध्यक्ष शालेय बालाजी पाटील वानखेडे संतोष पाटील वानखेडे रामराव पाटील ढगे यांच्यासह गावातील प्रतिष्ठीत मंडळी यावेळी उपस्थित होते 

Post a Comment

0 Comments