राज्यात लोकसभेच्या निवडणुकी पाठोपाठ विधानसभेच्या ही निवडणूका संपल्या आता निवडणूक विभागाला जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणुका गेल्या चार वर्षा पासून रखडल्या असताना सुद्धा सदरचे निवडणूक आयोग निवडणुक घेत नसल्यामुळे झोपेचे सोंग घेऊन बसलेत की काय ? असा सवाल जन सामान्य माणसातून केला जात आहे
सन २०२१ मध्ये जिल्हा परिषद व पंचायत समितीची मुदत संपूण जवळ पास चार वर्षे झाले असताना सुद्धा निवडणूक आयोग जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणुका घेण्यासाठी तयार नाही व त्याला वेळ मिळत नाही का ? सदर निवडणूक आयोग चाल ढकल करत असल्याचा सवाल जन सामान्य माणसातून केला जात आहे
राज्यातील जिल्हा परिषद गट व पंचायत समितीचे कार्यालय बिनधास्त वाऱ्यावर असल्यामुळे सदरच्या जिल्हा परिषद गटाला व पंचायत समिती कार्यालयाला कोणीच वाली नसल्याचे स्पष्ट चित्र गेल्या चार वर्षा पासून स्पष्ट दिसून येत आहे
राज्याचे निवडणूक विभाग हे सत्तेतील राज्यकर्त्याच्या व राजकीय पुढाऱ्याच्या इशाऱ्यावर चालणारे असल्यामुळे जो पर्यंत ह्या राज्यात ते राजकीय नेते निवडणूक विभागाला जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणुका जाहीर करा म्हणणार नाही तो पर्यंत सदरचे निवडणूक आयोग असेच झोपेचे सोंग घेऊन बसणार हे मात्र सत्य आहे

0 Comments