Header Ads Widget

ग्रामीण पोलिसांनी सराईत आरोपीची काढली धिंड यांच्यावर गंबीर गुन्हे केल्याचा ठपका ?

            माधव पवार 
ग्रामीण पोलीस स्टेश चा रेकॉर्डवर असलेले व वारंवार गुन्हे करणारे सराईत आरोपी यांची नांदेड ग्रामीण पोलीस यांनी दिनांक १० डिसेंबर रोजी मुख्य मार्केट मध्ये धिंड काढून फिरवले असल्याची माहिती मिळते आहे 
सदरचे आरोपी हे वारंवार गुन्हे करणारे मुख्य मार्केट मध्ये रस्त्याने गाड्या फिरवणारे हातात तलवारी घेऊन फिरणारे व सर्व सामान्यांना भीती वाटावी असे दहशत पसरविणारे आरोपी असल्याचे सांगण्यात येत आहे 

या पूर्वी त्यांच्यावर हाफ मर्डर, मर्डर सारखे गंभीर गुन्हे दाखल असून दोन दिवसां पूर्वी या आरोपीने मार्केट मध्ये तलवारी घेऊन मोटर सायकलने फिरवून दहशत पसरवली होती अशी माहिती मिळते आहे 

यामुळे सर्वसामान्य माणसांच्या मनामध्ये एक प्रकारची दहशत तयार झाली होती. आमच्यावर किती गुन्हे दाखल झाले तर काही होत नाही अशा अविर्भावांमध्ये हे आरोपी फिरत होते.

मात्र नांदेड ग्रामीण पोलिसांनी यांना तात्काळ अटक करून यांच्यावर गंभीर गुन्हे दाखल केले न्यायालयामध्ये सादर करून त्याचा पीसीआर घेतला आणि ज्या रस्त्याने हे आरोपी दहशत माजवत फिरत होते

त्याच रस्त्याने सिडकोच्या मुख्य रस्त्यावरून पोलिसांनी यांच्या हातामध्ये हातकड्या घालून दोर बांधून फिरवले.
 यामुळे सर्वसामान्य व्यक्ती महिला व्यापारी यांच्या काळातील दहशत कमी होऊन आरोपीच्या मनात दहशत बसली आहे

सर्वसामान्य जनतेतून पोलिसांच्या या कृतीबद्दल समाधान व्यक्त केले जात असून २०१२ मध्ये उमाप जेव्हा नांदेड जिल्ह्यामध्ये एस पी होते त्या काळात सिडकोतील एका कुख्यात गुंडाला अशाच पद्धतीने मार्केट मध्ये धिंड काढून फिरवले होते अशी माहिती आहे 

Post a Comment

0 Comments