Header Ads Widget

रीतेश ईबितवार याची नांदेड न्यायालयात कनिष्ठ लिपिक पदी निवड

    विकास भुरे मांजरमकर 
नायगाव येथे रहात असलेले सुजलेगाव येथील रीतेश हणमंत ईबितवार यांनी नांदेड जिल्ह्यात निघालेल्या न्यायालयातील कनिष्ठ लिपिक पदाची सरळ भरतीची परिक्षा दिली यात जवळपास दोन हजार विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली यात रितेश पाचव्या क्रमांकाने पास होऊन आपली नौकरी पक्की केली आहे.याबद्दल अधिक माहिती अशी रितेश ईबीतवार हा नायगाव येथे आपल्या कुटुंबासह भाड्याने रहाते.वडील हणमंत ईबितवार हे यात्रेमध्ये खेळाने विक्री करून तर आई प्रतिभा ईबितवार हे ब्युटी पार्लर उभारून आपल्या मुलांना शिक्षण दिले.अत्यंत हालाकीच्या परिस्थितीत शिक्षण देऊन आपल्या दोन्ही अपत्यांना पाठबळ दिले आहे 

रितेशने परिस्थितीची जाणीव ठेवून आई वडिलांचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी अभ्यासा कडे लक्ष दिले,नुकत्याच कनिष्ठ लिपिक पदाची परीक्षा देऊन तो दोन हजार विद्यार्थ्यांत पाचव्या क्रमांकाने उत्तीर्ण झाला आहे

या निमित्ताने माजी सैनिक व सध्या नांदेड पोलिस सेवेत असलेल्या खुशालराव तुपदाळे यांनी आपल्या भाडेकरू विद्यार्थाचा व पालकांचा सत्कार केला.यावेळी विकास भुरे, प्रतिभा ईबितवार, व्यंकटराव चोंडे,पियुष ईबितवार आदी मंडळी उपस्थित होती.

Post a Comment

0 Comments