हिमायतनगर क्रीडा व युवक संचालनालय महाराष्ट्र राज्य पुणे व जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय धुळे यांच्या संयुक्त विद्यमाने शालेय राज्यस्तरीय कराटे स्पर्धा नुकत्याच धुळे येथे आयोजित करण्यात आली होती .त्यावेळी नांदेड इथून कराटे प्रशिक्षक आकाश भोरे द्वारा संचलित kkc कराटे क्लबचे विद्यार्थी व विद्यार्थिनी सहभाग नोंदवला होता .त्यामध्ये प्रशिक्षक आकाश भोरे यांच्या मार्गदर्शनाखाली कुमारी अनुष्का जाधव हिने राज्यस्तरीय कराटे स्पर्धेमध्ये प्रथम क्रमांक पटकावून राष्ट्रीय स्तरावर राष्ट्रीय कराटे स्पर्धेसाठी तिची निवड झाली आहे .ही नांदेडची भूमिकन्या राष्ट्रीय स्तरावर महाराष्ट्राचे नेतृत्व करणार आहे. त्यामुळे तिच्यावर सर्वत्र कौतुकाचा वर्षाव होत आहे. या कौतुकास्पद कामगिरीमुळे तिचा जिल्हाधिकारी नांदेड यांच्या हस्ते सन्मान करण्यात आला. तसेच जिल्हाधिकारी नांदेड प्रशिक्षक आकाश भोरे पालक वर्ग आणि नातेवाईकांकडून अनुष्का चे
कौतुक केल्या जात आहे.

0 Comments