Header Ads Widget

नांदेड लोकसभा पोटनिवडणूकीचा खासदार तर नायगाव विधानसभा मतदार संघाचा विद्यमान नूतन आमदार कोण ? तमाम कार्यकर्त्यांना लागली चिंता !!

      माधव पवार 
नांदेड लोकसभा पोटनिवडणूक व विधानसभा निवडणूकीचे मतदान दिनांक २० नोव्हेंबर २०२४ रोजी शांततेत पार पडले परंतु दिनांक २३ नोव्हेंबर २०२४ रोजी सदरच्या निवडणुकीचा निकाल असल्यामुळे नांदेड लोकसभा पोटनिवडणूकीतील जिल्ह्याचा नूतन विद्यमान खासदार तर नायगाव विधानसभा मतदार संघाचा विद्यमान नूतन आमदार कोण ?अशी कार्यकर्त्यासह जनसामान्य माणसाला उत्सुकता लागली आहे

महाविकास आघाडीचे उमेदवार असो की महायुतीचे उमेदवार असो अथवा वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार असो त्याच बरोबर प्रहार जनशक्ती पक्षाचे उमेदवार असो आणि नांदेड लोकसभा पोटनिवडणूकीसाठी रिंगणात आपली कंबर खचली होती अशा पद्धतीने नायागांव विधानसभा मतदार संघात सुद्धा राजकीय पक्षाच्या उमेदवारा बरोबर अपक्ष उमेदवारानी सुद्धा उमेदवारी दाखल करून निवडणूक लढविली आहे 

लोकसभा पोटनिवडणूक व नायागांव विधानसभा मतदार संघाचा निकाल दिनांक २३ नोव्हेंबर २०२४ रोजी जाहीर होणार असल्यामुळे जिल्ह्याचा नूतन खासदार तर नायागांव विधानसभा मतदार संघाचा नूतन आमदार कोण ? ग्रामीण भागात चर्चेला उधाण आले आहे 

नांदेड लोकसभा पोटनिवडणूकीचा निकाल असो कीं नायागांव विधानसभा मतदार संघातील निकाल अशी लोकशाही मार्गाने लागणार असल्यामुळे सदरचा निकाल कोणाच्या ही बाजूने लागो त्या उमेदवाराना मान्य करावा लागणार आहे 

राजकीय पक्षाची नेते मंडळी उमेदवाराच्या प्रचारात आपला उमेदवार विजयी झाला पाहिजे म्हणून कार्यकर्ते ही मोठे प्रयत्न केले निवडणुकीतील उमेदवार सुद्धा आपआपल्या पद्धतीने प्रचार व मत वळविण्याचा प्रयत्न केला आहे 

Post a Comment

0 Comments