Header Ads Widget

नायगावच्या वाघाची दिल्लीत चर्चा काँग्रेसचा नांदेड जिल्ह्याचा गड प्राध्यापक रवींद्र पाटील चव्हाण राखला !!

       माधव पवार 
नांदेड लोकसभा पोटनिवडणूक व विधानसभा निवडणुकीच्या निकालाकडे राज्याचेच नव्हे तर दिल्लीचे लक्ष नांदेडकडे लागले होते राज्यात दिनांक २३ नोव्हेंबर २०२४ रोजी सर्वत्र फाटाक्याची अतिषबाजी करून राजकीय पक्षांच्या विजयी उमेदवारानी एक प्रकारची दिवाळीच साजरी केली आहे 

नांदेड जिल्ह्यातील नायगावच्या वाघाची मात्र काँग्रेस गड नांदेड अखेर काबीज केल्यामुळे दिल्ली चर्चा झाल्याचे सांगण्यात येत आहे 

नांदेड लोकसभा मतदार संघांचे लोकप्रिय खासदार दिवंगत वसंतराव चव्हाण यांचे सुपुत्र जिल्ह्याचे नूतन खासदार प्रा. रवींद्र वसंतराव पाटील चव्हाण यांनी महायुतीच्या उमेदवाराला म्हणजे डॉ संतुकराव हंबर्डे यांना बोन्ड्री आउट करून विजयी मिळविला असल्यामुळे जिल्ह्यात फटाक्याची अतिषबाजी करून नायगाव शहरात दिवाळीच साजरी करण्यात आली आहे

जिल्ह्याचा निकाल म्हणजे लोकसभा पोट निवडणुकीचा जिल्ह्यासाठी इतिहासीक लागल्यामुळे दिल्लीत या नायागांवच्या वाघाची चर्चा होताना दिसते आहे

जिल्ह्याचे लोकप्रिय खासदार दिवंगत वसंतराव चव्हाण यांचे करण्यासाठी जिल्ह्यात परत एकदा वसंत ऋतू नंतर रवी किरण उगवला आहे 



Post a Comment

0 Comments