नांदेड लोकसभा पोटनिवडणूक व जिल्ह्यातील विधानसभा निवडणूकींचे मतदान आज दिनांक २० नोव्हेंबर २०२४ रोजी उशिरा पर्यंत करण्यात आले असले तरी काही ठिकाणच्या मतदान मशीन थोडया वेळा साठी बंद पडल्या असल्या तरी सर्वत्र मतदान शांततेत करण्यात आले आहे
नांदेड जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक अबिनाश कुमार यांनी जिल्ह्यात नांदेड लोकसभा पोटनिवडणूक व विधानसभा सार्वत्रिक निवडणूक भयमुक्त व शांततेत पार पाडण्यासाठी बाहेरील एस एस बी बी ए एस एफ सी आर एफ एकूण दहा कंपनीचे कर्मचारी तैनात केले होते
जिल्ह्यातील मतदान केंद्रावर काही अनुचित प्रकार घडू नये पोलीस अधीक्षक अबिनाश कुमार यांच्या आदेशानुसार पोलीस उपाधिक्षक सूरज गुरव यांच्यासह उपाधीक्षक २ सपोनी पोउपनी २५ पोलीस अंमलदार ४५२ प्रशिक्षणार्थी पोलीस अमलदार ४०० तैनात केले आहे
खेड्या पाड्यात होमगार्ड २८७२ तसेच नांदेड पोलीस दलातील पोलीस अधिकारी २०० पोलीस अमलदार २७०० कर्मचारी तैनात करण्यात आले आहे

0 Comments