गेल्या एक ते दोन महिन्या पासून डोळ्यात तेल टाकून मतदाराच्या भेटीसाठी घेऊन लोकसभा व विधानसभेच्या निवडणुकीसाठी उमेदवारी दाखल केलेले उमेदवार यांचा फैसला आज दिनांक २३ नोव्हेंबर २४ रोजी जनतेच्या दरबारातून मत पेटीत बंद झाला होता बंद पेटी उघडून आता उमेदवाराचा फैसला केला जाणार आहे
नांदेड लोकसभा पोटनिवडणूक व विधानसभा निवडणुकीचा निकाल आज असल्यामुळे उमेदवाराच्या ऊरात रात्र पासून धडकी भरली असल्यामुळे निकाल कोणाच्या बाजूने जाईल व आपण विजयी होईल का दुसरा उमेदवार विजयी होईल असे बेरीज वजाबाकी करण्यात आली होती परंतु जनतेच्या दरबारातून मत पेटीत मत बंद झाले असल्याचे आता उघड केले जाणार आहे
देशातली व राज्यातील लोकशाही बळकट होण्यासाठी मतदारांनी रात्री दहा वाजे पर्यंत सर्वत्र मतदान केले असे मतदान उशिरा पर्यंत आज पर्यंत कधी ग्रामीण भागात झाले नव्हते परंतु यंदाच्या लोकसभा पोटनिवडणूक विधानसभेचा निकाल ऐतिहासिक लागणार असल्याने नायगाव विधानसभा मतदार संघाचा चांगला इतिहास घडणार आहे

0 Comments