महाराष्ट्र राज्याचे माजी मुख्यमंत्री अशोकराव चव्हाण यांनी नांदेड लोकसभा पोटनिवडणूक व नायगाव विधानसभा मतदार संघाच्या निवडणुकीत लोकसभेसाठी महायुती कडून डॉ संतुकराव हंबर्डे तर नायगाव विधानसभा मतदार संघाच्या निवडणुकीत मा. राजेश पवार यांच्या प्रचारासाठी नायगाव तालुक्यातील बरबडा येथे उद्या दिनांक ११ नोव्हेंबर २०२४ रोजी संध्याकाळी ८ वाजता जाहीर सभेचे आयोजन करण्यात आले आहे
या सदरच्या जाहीर सभेसाठी शेकडोच्या संख्येनी मतदार बांधव उपस्थित राहावे असे आवाहन बरबड्याचे विद्यमान सरपंच माधवराव कोलगाणे यांनी केले आहे
नांदेड लोकसभा पोट निवडणूकीच्या रिंगणात महायुती कडून भारतीय जनता पार्टीचे लोकसभेचे अधिकृत उमेदवार डॉ संतुकराव हंबर्डे यांनी सदरच्या रिंगणात कंबर खचली तर नायगाव विधानसभा मतदार संघाच्या निवडणुकीत मा. राजेश पवार हे रिंगणात आहेत
महायुतीच्या प्रचारासाठी माजी मुख्यमंत्री अशोकराव चव्हाण यांच्या उपस्थितीत तालुक्यातील बरबडा येथे बस्टँड जवळ जाहीर सभेचे आयोजन करण्यात आले आहे

0 Comments