Header Ads Widget

नायगाव विधानसभा मतदार संघात जरांगे फॅक्टरची धास्ती मा. शिवराज पाटील होटाळकर अपक्ष उमेदवारी दाखल करणार : व जरांगे फॅक्टर जबरदस्त चालणार !!

       माधव पवार 
हिंदवी स्वराज्याचे संस्थापक शिव छत्रपती शिवाजी महाराज यांचे विचार अंगी करून मराठा योद्धा मनोज जरांगे पाटील यांना मराठा समाजाच्या प्रश्नासाठी सरकार वर झेप घेतली आहे 

सध्याच्या परिस्थितीत विधानसभा लोकसभा निवडणुका लागल्या असल्यामुळे नायागांव विधानसभा मतदार संघात जरांगे फॅक्टरची चांगलीच धास्ती बसली आहे 

मराठा योद्धा मनोज जरांगे पाटील यांच्या नेतृत्वाखाली व आदेशाने माजी शिक्षण सभापती शिवराज पाटील होटाळकर यांनी नायागांव विधानसभा गाजविण्यासाठी जरांगे पाटील यांच्या कडून अपक्ष उमेदवारी दाखल आहे 

नायगाव विधानसभा मतदार संघात आता निवडणुकीत जरांगे फॅक्टर जबरदस्त चालणार असल्याचे चित्र स्पष्ट दिसून येत सध्या तरी दिसून येत आहे 

सदरची नायगाव विधानसभा मतदार संघाची निवडणूक ही कोणत्या जाती धर्मा पूर्ती नाही तर सर्व समाज बांधवांना सोबत घेऊन सदरची निवडणूक लढविण्यासाठी मराठा योद्धा मनोज जरांगे पाटील यांनी माजी शिक्षण सभापती शिवराज पाटील यांना उमेदवारी दाखल करण्यासाठी सांगितले आहे 

Post a Comment

0 Comments