Header Ads Widget

हादगाव तहसील कार्यालयात नूतन दमदार महिला तहसीलदार सुरेखाताई नांदे पदभार स्विकारला असल्यामुळे जन सामान्य माणसाचे प्रश्न मार्गी लागणार !!

  
 माधव पवार  / नागोराव शिंदे - 
----------------------------------------
नांदेड जिल्ह्याच्या नायगाव तहसील कार्यालयात तत्कालिन तहसीलदार सुरेखा नांदे यांनी कार्यरत असताना शेतकरी वर्गा व जन सामान्य माणसाचे निराधार योजना श्रावण बाळ योजनेसह आत्महत्या ग्रस्त शेतकऱ्यांना मोठया प्रमाणात शासकीय लाभ मिळवून देण्यासाठी मोठे प्रयत्न कर्तव्य दक्ष तहसीलदार सुरेखाताई नांदे याने केले आहे 

नुकत्याच हादगाव तहसील कार्यालयात रुजू झालेल्या नूतन दमदार महिला तहसीलदार सुरेखाताई नांदे पदभार स्विकारला असल्याचे सांगण्यात येत असून या तहसील कार्यक्षेत्रात असलेल्या गावातील शेतकऱ्यांना शासकीय अनुदान असो की निराधार योजनेच्या लोकांना व शासकीय लाभ मिळवून देण्यासाठी प्रयत्न नूतन तहसीलदार सुरेखाताई नांदे करतील अशी अपेक्षा जनतेनी व्यक्त केली आहे 

नायगावच्या तहसील कार्यालयात असताना तत्कालीन तहसीलदार सुरेखाताई नांदे यांनी शासनाच्या तिजोरी मध्ये मोठ्या प्रमाणात महसूल गोळा करून दिला होता त्यावेळी अवैध उत्खनन करणाऱ्या लोकांवर कारवाई करत शासनाच्या तिजोरीत मोठ्या प्रमाणात महसूल जमा केला आहे 

तत्कालीन नायगावच्या तहसीलदार सुरेखाताई नांदे हे सध्याच्या परिस्थिती मध्ये हादगाव तहसील कार्यालयाच्या तहसीलदार म्हणून कर्तव्य बजावत असून नायगाव तहसील कार्याच्या कार्यक्षेत्रात असलेल्या गावांमध्ये पांदण रस्त्याला कामाला अतिशय महत्त्व देऊन पांदण रस्त्याचे काम पूर्ण करून घेतले आहे 




Post a Comment

0 Comments