नायगाव विधानसभा मतदार संघात भारतीय जनता पार्टीचे माजी शिक्षण सभापती शिवराज पाटील होटाळकर यांना येत्या विधानसभा निवडणुकीसाठी पोषक वातावरण असल्याचे दिसून येत असून सध्याच्या परिस्थितीत सदरचा मतदार संघ हा होटाळकर पिंजून काढत आहे
या सदरच्या मतदार संघात अनेक नवीन चेहरे रिंगणात उतरणार असल्यामुळे त्यांचा फायदा माजी शिक्षण सभापती शिवराज पाटील होटाळकर यांना चांगलाच होऊ शकतो असा अंदाज व्यक्त केला जात आहे
मागील विधानसभा निवडणुकीत भारतीय जनता पार्टीला यश जरी प्राप्त झाले असले तरी सदरचे यश रिपाईमुळे प्राप्त झाले असल्यामुळे या मतदार संघांचे आमदार राजेश पवार झाले आहेत
भारतीय जनता पार्टीचे चिन्ह आणि रिपाईचे तिकीट सर्व मागासवर्गीय मतदार मा.रामदास आठवले यांचा उमेदवार म्हणून मतदार मतदान केले होते परंतु यावेळी मात्र भारतीय जनता पार्टीचे माजी शिक्षण सभापती शिवराज पाटील होटाळकर यांना मतदानाच्या रूपाने संधी मिळणार आहे

0 Comments