Header Ads Widget

सुपर बॉस : सत्ता हातात नसताना सुद्धा राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश सरचिटणीस वसंत पाटील सुगावे यांनी घुंगराळा कार्यक्षेत्रा अंतर्गत असलेल्या गावाच्या विकास करण्यासाठी दोन कोठी पन्नास लाख रुपयाचा आणला निधी !!

      माधव पवार 
राजकीय लेव्हल कायम ठेवून सत्ता धाऱ्याच्या सानिद्यात राहून सत्ता हातात नसताना सुद्धा राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश सरचिटणीस वसंत पाटील सुगावे यांनी घुंगराळा कार्यक्षेत्रा अंतर्गत असलेल्या गावाच्या विकास कामासाठी नुकताच दोन कोठी पन्नास लाख रुपयाचा निधी मंजुर करून घेतला असल्यामुळे त्यांच्या कर्तव्याचे सर्वत्र कौतुक केल्या जात आहे 

राजकीय क्षेत्रात गेल्या अनेक वर्षा पासून राज्यातल्या सत्ताधाऱ्यांच्या सानिध्या मध्ये राहू गावच्या विकासासाठी व परिसरांच्या विकासासाठी राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश सरचिटणीस वसंत पाटील सुगावे यांनी कोट्यावधी रुपयांच्या निधीची मागणी करून ते मागणी मंजूर करून घेत आहेत 

नांदेड जिल्ह्याच्या नायगाव तालुक्यातील घुंगराळा येथील रहिवासी असलेला हा दमदार ग्रामीण पुढारी आपले अस्तित्व या भागात टिकून ठेवण्यासाठी हाय पावर नेते मंडळी कडे जाऊन निधीच्या संदर्भा मध्ये चर्चा करून निधी मंजूर करून घेण्यासाठी प्रयत्न करीत आहेत 

यामध्ये घुंगराळा येथील खंडोबा मंदिर परिसरातील उर्वरित सभामंडप व मंगलकार्यालय यासाठी प्रादेशिक पर्यटन विकास योजनेतून 75 लक्ष रुपये मंजूर करण्यात आले आहे 

या अगोदर या सभामंडपासाठी एक कोटी  रुपये मंजूर करण्यात आले होते. व आता उर्वरित कामांसाठी 75 लक्ष रुपये मंजूर करण्यात आले. घुंगराळा येथे राज्य सरकारच्या रोजगार हमी योजना(९०-१०) या योजनेतून सी. सी. रस्ता/पेव्हर ब्लॉक बांधकामांसाठी 30 लक्ष रुपये मंजूर करण्यात आले आहे 

ग्रामविकास विभागाच्या २५/ १५ या योजनेतून घुंगराळा, वंजारवाडी,सावरखेड या गावातील सी. सी. रस्ता/नालीबांधकाम या कामांकरिता ४० लक्ष रुपये निधी मंजूर करण्यात आला. जिल्हा नियोजन समितीच्या जनसुविधा योजनेतून सावरखेड व वंजारवाडी या गावात सी. सी. रोड, नालीबांधकाम याकरिता १२लक्ष रुपये निधी मंजूर करण्यात आला आहे 

जिल्हा परिषदेच्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर वस्ती विकास योजना(दलित वस्ती) या योजनेतून घुंगराळा येथे सी. सी. रोड,नालीबांधकाम ,व समाजमंदिर  बांधकाम या कामांकरिता ३० लक्ष रुपये निधी मंजूर करण्यात आला तसेच रानसुगाव येथे जिल्हा नियोजन समितीच्या अंगणवाडी बांधकाम व दुरुस्ती या करिता ११ लक्ष रुपये निधी मंजूर करण्यात आला आहे 

घुंगराळा येथे जिल्हा नियोजन समितीच्या माध्यमातून नवीन १०० के. व्ही. विद्युत डीपी व १ कि.मी.विद्युत लाईन १७  विद्युत पोल याकरिता २० लक्ष रुपये निधी मंजूर करण्यात आला,तसेच खंडोबा मंदिर परिसरात ग्रामविकास खात्याच्या गट ब  (३०-५४ )या योजनेतून खंडोबा मंदिर परिसरात असलेल्या रोडलगत संरक्षक भिंत बांधकामाकरिता ५० लक्ष रुपये निधी मंजूर करण्यात आला आहे 
  
एकंदरीत दोन कोटी ५० लक्ष रुपयांचा निधी विकास कामांसाठी मंजूर करण्यात आला अशी माहिती राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेशसरचिटणीस वसंत सुगावे पाटील यांनी दिली आहे 
  
सदर निधी मंजूर केल्याबद्दल वसंत सुगावे पाटील यांनी राज्याचे उपमुख्यमंत्री मा.ना.अजितदादा पवार, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष खा. सुनील तटकरे,नांदेड जिल्ह्याचे पालकमंत्री मा.ना.गिरिषजी महाजन जिल्हाधिकारी जिल्हा नियोजन अधिकारी एमएसईबीचे अधीक्षक अभियंता यांचे आभार मानले आहे 
         


Post a Comment

0 Comments