Header Ads Widget

शेतकरी नेते कवळे गुरुजी यांच्या नेतृत्वाची लढाई म्हणजे लोकसभा पोट निवडणूकीची खरच उमेदवारी मिळणार का ? जनतेत चर्चा !!

       माधव पवार 
राज्याचे माजी मुख्यमंत्री अशोकराव चव्हाण यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून शेतकरी नेते कवळे गुरुजी हे राजकारणात सक्रिय झाले असून जिल्ह्याचे खासदार दिवंगत वसंतराव चव्हाण यांच्या निधना नंतर या जिल्ह्याचा खासदार कोण होणार असा प्रश्न चर्चेला जात आहे 

नांदेड जिल्ह्याचे राजकारण पाहिले तर वेगळेच झाले कोणत्या ही निवडणुका लागण्या पूर्वीच जिल्ह्यात मोठे चर्चेला मोठे उदान येत असते असेच एक नाव नामांकित शेतकरी नेते तथा भारतीय जनता पार्टीचे शेतकऱ्याचे कैवारी कवळे गुरुजी यांना खरच लोकसभा पोट निवडणुकीची उमेदवारी मिळणार का ? असा सवाल केला जात आहे 

राज्यातल्या कोणत्या ही राजकीय नेत्यासह राजकीय पुढाऱ्याना सत्ता प्यारी असते शेतकरी नेते कवळे गुरुजी यांना सत्ता प्यारी नसली तरी सत्तेसाठी येणाऱ्या लोकसभा पोट निवडणूकीत उतरत असल्यामुळे कवळे गुरुजी यांच्या नावाची चर्चा भक्कम होत आहे 

सत्तेसाठी हाप हापलेले राजकीय पुढारी हे शेतकऱ्याकडे पाहत नाहीत जनतेच्या विकासाचे त्यांना काही देणे घेणे नसते परंतु शेतकरी नेते कवळे यांच्या माध्यमातून मात्र शेकडो शेतकऱ्यांना फायदा झाला असल्याचे सांगण्यात येत आहे 

सध्याच्या परिस्थितीत जिल्ह्याच्या राजकारणात चर्चेत असलेले कवळे गुरुजी हे तरुण वर्गाला रोजगार मिळवून दिला व त्यांच्या माध्यमातून अनेकाचे आर्थिक बाजू भक्कम झाल्याचे सांगण्यात येत असले तरी कवळे गुरुजी यांचे नेतृत्व एकदम कायम असल्याची चर्चा आहे 

Post a Comment

0 Comments