Header Ads Widget

आयपीएस अबिनाश कुमार यांचे आदेश पाळून कर्तव्य बजावणारे सिंगम पोलीस निरीक्षक ओमाकांत चिंचोलकर यांची नांदेडच्या ग्रामीण पोलीस ठाण्यात बदली - आता गुंडगिरीला बसणार आळा !!

       माधव पवार 
नांदेड जिल्ह्याचे आयपीएस अबिनाश कुमार यांचे आदेश पाळून कर्तव्य बजावणारे सिंगम पोलीस निरीक्षक ओमाकांत चिंचोलकर यांची नांदेडच्या ग्रामीण पोलीस ठाण्यात बदली असून या पोलीस ठाण्याच्या कार्यक्षेत्रात सिंगम चिंचोलकर यांनी जास्तीचे लक्ष ठेवून शांतता टिकवून ठेवण्यासाठी प्रयत्न करणार आहे 

ग्रामीण पोलीस ठाण्याच्या कार्यक्षेत्राच्या अंतर्गत चालणाऱ्या अवैध धंद्याना व गुंड वृतीच्या लोकांना सळो की पळो करून सोडतील अशी अपेक्षा जनतेनी व्यक्त केली आहे 

नांदेड जिल्ह्याच्या नायगाव पोलीस ठाण्यात कार्यरत असताना सुद्धा सिंगम पोलीस निरीक्षक ओमाकांत चिंचोलकर यांनी दमदार कामगिरी केली होती उत्कृष्ट काम करणाऱ्या पोलीस कर्मचाऱ्याचा ही त्यांच्या हस्ते सन्मान करण्यात आला आहे 

जिल्ह्यातील नायगाव पोलीस ठाण्यातुन लोहा पोलीस ठाण्यात दमदार पोलीस अधिकारी म्हणून ओमाकांत चिंचोलकर यांची बदली लोहा पोलीस ठाण्यात करण्यात आली होती या पोलीस ठाण्याच्या कार्यक्षेत्रात ही दमदार कामगिरी बजावली आहे 

लोहा पोलीस ठाण्यातुन आता सिंगम पोलीस निरीक्षक ओमाकांत चिंचोलकर यांची बदली नांदेड ग्रामीण पोलीस ठाण्यात बदली झाली आहे 

ग्रामीण पोलीस ठाण्याच्या कार्यक्षेत्रात अधुन मधुन चालनारे अवैध धंदे व दहशत निर्माण करणाऱ्या लोकाची गैय केली जाणार नाही असे त्यांचे दमदार वाक्य असते 

लोहाचे सिंगम पोलीस निरीक्षक ओमाकांत चिंचोलकर यांची नांदेडच्या ग्रामीण पोलीस ठाण्यात बदली झाली असल्यामुळे  गुंडगिरीला व अवैध धंद्याला आता आळा बसणार आहे 

Post a Comment

0 Comments